29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य

पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य

पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य

Share Post

पुण्यातली महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी परवा पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य

यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या, पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. त्याप्रसंगी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी प्रचंड गर्दी दिसून आली. या गर्दीवरूनच लक्षात येते कीत पुणेकर नागरिक किती उत्साही आहेत. पुणेकर फारस कोणालाही डोक्यावर घेत नाही. परंतु काल मुरलीधर मोहोळ यांनी जे काही काम केलं आहे. त्या कामाची उतराई म्हणून खऱ्या अर्थाने इतक्या उन्हामध्ये सुद्धा पुणेकर रस्त्यावर उतरलेले होते. त्यामुळे पुण्याची निवडणूक ही पुणेकरांनी आता हातात घेतली आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरणे ही औपचारिकता असून मुरलीधर मोहोळ यांनी केलेली विकासकामांमुळे पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,पुण्याच्या पुढील ५० वर्षाचा विचार करून शहरात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने विकास कामे सुरू केली आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे. पुण्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुढील काळात परिसरात ५० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. शिक्षणाच्या आणखी चांगल्या संधी निर्माण होणे, नवीन उद्योग आणणे, रोजगारनिर्मिती करणे, पायाभुत सुविधा निर्माण करणे यासाठी ही निवडणुक लढवत असून पुणेकर मला नक्की विजयी करतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य
पुणेकरांनी कालच निकाल दाखवून दिला रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य