पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोहोळांना पाठिंबा जाहीर
‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत. त्यामुळे आमचा मुरलीअण्णांना पाठिंबा आहे,’ अशा भावना आपल्यासमोरच व्यक्त होतात, तेव्हा आपण जपलेली श्रद्धा, भावना केवळ आपली नाही, ती करोडो भारतीयांची आहे, याची खात्री पटते. अशी भावना पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या. पुण्यात २७ हिंदुत्ववादी संघटनांनी मोहोळांना पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोहोळांना पाठिंबा जाहीर
सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे शहरातील एकूण २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हिंदू जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हिंदुत्ववादी संघटनांचे सारेच निस्सीम कार्यकर्ते एकत्र आले होते. ही माणसं एका ध्येयानं झपाटलेली असतात. ती जेव्हा एखाद्याला आपलंसं मानतात, तेव्हा त्याच्या प्रत्येक कार्यात ती खंबीरपणे साथ देतात. त्यांचे प्रेम पाहून, भावना ऐकून हेलावून गेलो.
या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणुन संघटित राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत कितीतरी जण मनमोकळं बोलत होते. इथं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे अनेक लोक निवडणूक म्हटली की आपल्या अपेक्षांचं गाठोडं घेऊन उभीच असतात. यांनी मात्र ‘आधी प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आणू, मग त्यांना हक्काने अपेक्षा आणि कामं सांगू. मुळात अण्णाला कामं सांगावीच लागत नाहीत. ती होतातच,’ असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
आजवरच्या कामांतून हा विश्वास आपल्याला कमावता आला, याचंही समाधान वाटतं राहतं. हा मेळावा त्या अर्थाने खूप मानसिक बळ देणारा ठरला. त्यांच्या भावनांना उत्तर देताना मीही, ‘तुमच्या कोणत्याही विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही,’ . माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात, हे ऋणही कधीच विसरणार नाही. असं म्हणत त्यांनी पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरंटी देतो, अशीही ग्वाही देखील त्यांनी दिली.