Daily Update

अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात मिटकरींचा आरोप

Share Post

शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत  नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात मिटकरींचा आरोप

शिरूर लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे  उमेदवार शिवाजी आढळराव पाटील  यांच्या प्रचारार्थ  कडुस येथील कोपरा सभेत मिटकरी बोलत होते.  यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले,  मी कोल्हे साहेबांचा फॅन होतो, त्यांच्या सोबत राहायचो मला अभिमान वाटायचा  मी ज्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजले मात्र तो माणूस केवळ केळव जटा  वाढवून साधुचा आव आणणारा निघाला.  मी राज्यभर दौरे केले होते यांच्यासोबत त्यांनी मात्र  मला दिल्लीत दोन दिवस  भेटीसाठी ताटकळत ठेवले होते असेही मिटकरी यांनी सांगितले.  छत्रपतींची भूमिका करणाऱ्या माणसाने गड किलयांचे जतन करायचे की तिथे जाऊन लव्ह सॉन्ग शूट करायचे हे भान सुद्धा याला नाही अशा शब्दांत कोल्हेंवर टीका केली.  

 डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक भावनिक करण्याचा  प्रयत्न  केला जात आहे, त्याचा खरपूस समाचार मिटकरी यांनी घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थाळ तुमच्या गावाजवळ आहे, मात्र तूनही फक्त निवडून आले तेंव्हा गेलात, त्यानंतर डायरेक्ट प्रचारासाठी पाच वर्षांनी, त्यातही गडावर शिवाजीराव भेटले  तर कॅमेऱ्या समोर दादांचे दर्शन घेतले आणि त्या बातम्या चालवल्या, आमच्या समोर कोणतेही वडीलधारी व्यक्ती आली की आम्ही त्यांच्या पाया पडतो त्यात नवीन काय आहे,  एक मात्र मानले पाहिजे की शिवाजीरावांनी तुम्हाला पाया पडू दिले हा त्यांचा मोठेपणा आहे. 

लोकसभा निवडणूक ही स्थानिक नाही तर ही देशाची निवडणूक आहे,  देशाच्या विकासाचा शक्तिशाली चेहरा म्हणून जग  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहात  आहे यामुळे आपल्याला विकासाला साथ देण्यासाठी शिवाजीराव आढळराव यांना संयदेत पाठवायचे आहे, असेही मिटकरी यांनी नमूद केले.  डायलॉग बाजी आम्हालाही करता येते, संसदेत शेवटच्या सत्रात कांद्याची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा अभिनय केला, मात्र तुम्हाला ज्या कामासाठी संसदेत पाठवले होते तिथे पाच वर्षे काय झोपा काढल्या  का? असा सवाल उपस्थित करत आढळराव यांनी त्यांच्या तीन टर्म मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत मिटकरी यांनी आढळराव यांना विकासासाठी मते द्या  असे आवाहन  केले.  तसेच अक्षय आढळराव यांनी संरक्षण क्षेत्रावरील आरोपावरून कोल्हे यांची केलेली पोळखोल उत्तम असल्याचे मिटकरी यांनी म्हंटले. अजित पवार यांनी निष्ठा सोडली या कोल्हे यांच्या आरोपांवर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, तुम्ही मनसे मध्ये होता, मग शिवसेना नंतर अजित पवारांच्या आशीर्वादानेच राष्ट्रवादीत आलात आणि खासदार झालात. आज त्यांचीही साथ सोडून 84 वर्षांच्या पवार साहेबांना प्रचारासाठी येण्याची गळ घालता , यामुळे तुम्ही  निष्ठा या शब्दावर न बोलणेच अधिक चांगले. अमित शहा यांना तुम्ही का भेटले होता? गरुड झेप सिनेमासाठी खरंच घर गहाण ठेवले की सोशल मिडियावर सहानुभूमी मिळवण्याचा प्रयत्न केला असा  सवाल ही मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच सुप्रिया ताई चतुर्थीला आणि अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात असा आरोप केला.

अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात मिटकरींचा आरोप
अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात मिटकरींचा आरोप