…ही माझी शेवटची निवडणूक आहे- शिवाजीराव आढळराव पाटील
महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय. …ही माझी शेवटची निवडणूक आहे- शिवाजीराव आढळराव पाटील
मागील काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. यातच आता अजित पवारांच्या सभा देखील शिरूरमध्ये होत आहेत. तर महायुतीचे सर्वच नेते, स्थानिक पदाधिकारी, आढळरावांसाठी झपाटून काम करतांना दिसत आहेत. यातच शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका सभेत आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.
पुढे बोलतांना ते असेही म्हटले की, भविष्यात निवडणूक लढेल की नाही लढेल काही सांगता येत नाही. पण यावेळेला संधी द्या. आपल्या भागात जी कामं अपुर्ण राहिली ती पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही शिवरायांची भूमी आहे. क्रांतीकारांची भूमी आहे. ही शूरवीरांची भूमी आहे. या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचे काय ऐकत नाही. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.