23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

भाजप संविधान बदलणार, मुस्लिम संकटात येणार या अफवा - नितीन गडकरी

भाजप संविधान बदलणार मुस्लिम संकटात येणार या अफवा – नितीन गडकरी

Share Post

शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. लोकसभेची निवडणूक ही देशाची आहे.  देशाचं भविष्य घडविणे, भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून  मिळणार आहे.  गरीब मजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचे,  तरुण मुलांच्या  हाताला काम द्यायचे,  गाव सुखी समृद्ध संपन्न करायचे ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न संपूर्ण करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचा सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, महायुतीचे उमेदवार आढळरांची ही पहिली निवडणूक नाही या मतदारसंघात जी काही कामे झाली आहेत त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे.  मागील काळामध्ये आढळराव सातत्याने अनेक वेळा माझ्याकडे आले या कामाचा त्यांनी फॉलो केला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील  बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नितीन गडकरी  बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना गडकरी म्हणाले, शहरात मोठ्या  प्रमाणावर  लोकसंख्या वाढते आहे  त्यामुळे स्वाभाविकपणे आज कितीही रस्ते बांधले तरी ट्रॅफिक कमी होत नाही.  पुण्यापासून संभाजीनगर पर्यंत एक नवीन रस्ता बांधायचा निर्णय केलेला आहे आणि हे काम  आम्ही महाराष्ट्र सरकारच्या एमएसआईडीसीला  देण्याचा निर्णय घेतला आहे.  संभाजीनगर दोन तासांमध्ये पण त्याचबरोबर पुणे, मुंबई, सोलापूर  आणि कोल्हापूरचा ट्रॅफिक कमी करण्याचा  खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, या नवीन मार्गामुळे आपल्या शहरांवरील वाहतुकीचा बहार  कमी होणार आहे. नवी दिल्ली ते मुंबई हा मेगा हायवे लवकरच पूर्ण होणार आहे त्याला  जोडणारा हा मार्ग दक्षिणेत जाणारा असेल असे गडकरी यांनी सांगितले. 

आपल्या भागामध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम पासून मुक्ती मिळावी म्हणून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट 40 हजार कोटी रुपये खर्च करून  बांधायचा निर्णय घेतलेला आहे. तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर  या 54 किलोमीटर लांबी मध्ये डबल डेकर उड्डाणपूल आहे.  मला विश्वास आहे की हा रस्ता झाल्यावर  तळेगाव चाकण शिक्रापूर पर्यंत येण्याचा ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम यातून पूर्णपणे सुटेल. तिसरा जो रस्ता आहे तो पुणे ते शिरूर आहे आणि हा जो हायवे प्रोजेक्ट  दहा हजार कोटी रुपयांचा आहे. 

या हायवेमुळे निश्चितपणे शिरूर पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्राफिक जाम राहणार नाही आणि त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण पण कमी होईल आणि मल्टीलेयर फ्लाय ओव्हर  असल्यामुळे वरुण  लोक नगरकडे  निघून जातील. हडपसर ते यवत हा जवळपास चार हजार कोटी रुपयांचा 33 किलोमीटर रस्ता आणि त्यावर डबल ढेकर रेल्वे आहे. यामुळे मला विश्वास आहे की वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल.  जिथे दीड तास लागला तिथे वीस मिनिटात आपला प्रवास होईल, त्याला  रिंग रोडची जोड आहे असेही गडकरी यांनी नमूद केले. आज भाजप सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास करत आहे त्यावर विरोधकांकडे उत्तर नाही, यामुळेच भाजप संविधान बदलणार, मुस्लिम संकटात येणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत असेही गडकरी यांनी सांगितले.

भाजप संविधान बदलणार, मुस्लिम संकटात येणार या अफवा - नितीन गडकरी