20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ - अमोल कोल्हे

वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ - अमोल कोल्हे

वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ – अमोल कोल्हे

Share Post

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ – अमोल कोल्हे

“राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

दरम्यान, अमोल कोल्हे यांची घोषणा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका होत आहे. मोठ्या अपेक्षाने कोल्हे यांना वेळी लोकांनी निवडून दिले होते, मात्र त्यांनी पाच वर्षात मतदारसंघाकडे पाठ फिरवली. लोकांची तसेच मतदारसंघात विकास कामे केली नाही. आता केवळ पराभव दिसू लागल्याने ते अभिनय सोडण्याची भाषा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ - अमोल कोल्हे