20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

डॉ.अमोल कोल्हे हे  विकासकामांवर बोलत नाहीत - महेश लांडगे

डॉ.अमोल कोल्हे हे  विकासकामांवर बोलत नाहीत – महेश लांडगे

Share Post

राज्यात लोकसभेच्या टप्यासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात आज प्रचाराचा शेवटचा दिसव आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. ”सत्ता नसताना अडीच वर्षे आम्ही फार संघर्षात काढली. सत्ता आल्यानंतर प्राधिकरणाचा साडेबारा टक्यांचा प्रश्न निकाली काढला. शास्तीकर माफ केला. जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातून आढळराव पाटील यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य देण्याची ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.डॉ.अमोल कोल्हे हे  विकासकामांवर बोलत नाहीत – महेश लांडगे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी येथे विजय संकल्प सभा पार पडली यावेळी आमदार महेश लांडगे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील विकासकामांमुळे आम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारावर टीका करण्याची गरजच भासली नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे  विकासकामांवर बोलत नाहीत. ते आता व्यक्तिगत टिका करत आहेत. 

महायुतीच्या सरकारमुळे प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा मिळाला आहे.  मिळकतकरासोबत कचरा संकलनासंदर्भातील उपयोगिता शुल्क आकारणी रद्द करण्यात आले आहे.  पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळाली आहेत. , पिंपरी – चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, आंद्रा, भामा-आसखेड पाणी योजना सुरू सुरू झाल्या आहेत.  पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश प्रश्न सुटले आहेत. आता फक्त  रेड झोनचा प्रश्न मार्गी लावावा अशी माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे.

डॉ.अमोल कोल्हे हे  विकासकामांवर बोलत नाहीत – महेश लांडगे