Daily UpdatePune | NEWS

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

Share Post

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, एम.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दप्तरचे मोफत वाटप करत अनेक समाजोपयोगी उपक्रम
पुणे शहरामध्ये गेली ४० वर्षापेक्षा जास्त समाजकारण, राजकारण करणारे, गणेश मंडळाचे भक्कम आधारस्तंभ पुणे शहराचे दीपस्तंभ श्री. दीपक मानकर यांनी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम करून साजरा करण्यात आला.दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

त्यांनी सर्वप्रथम पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत दर्शन घेतले, यावेळी बाप्पाच्या चरणी शंखनाद आणि श्रींची आरती करून ६५ किलोचा मोदक अर्पण करण्यात आला. पुणे शहरातील दिव्यांग बंधू-भगिनीसाठी व्हीलचेअर, अंध व्यक्तींना काठी, एम.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दप्तरचे मोफत वाटप करण्यात आले.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

दीपक मानकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केक, गुच्छ व भेटवस्तू न आणता वह्या,पुस्तके, फळे आणावीत असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आलेले सर्व साहित्य पुणे शहरालगत असलेल्या अनाथआश्रम, वृद्धाश्रम येथे त्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी तृतीयपंथी व महिलांकडून ६५ दिव्यांनी ओवाळण्यात आले व वह्या-पुस्तके तुला सुद्धा करण्यात आला होता.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

सदर प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, वर्धाचे खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, प्रवीण तरडे, अप्पा रेणुसे, मेघराजे भोसले, प्रवीण चोरबोले, धीरज घाटे, शुक्राचार्य वांजळे, राजेश पांडे, विविध क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्ती, मान्यवर, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपक मानकर यांना शुभेच्छा दिल्या.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप