29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत

आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत

आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत

Share Post

महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शरदवाडी, वडनेर खुर्द गावांत आढळराव पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टि करुन तसेच ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, ” ही गावे माझी हक्काची गावे आहेत. या ठिकाणच्या माझ्या लोकांनी मला कायमच साथ दिली आहे. त्यामुळे या परिसरातून आपण मला चांगले मताधिक्य द्याल, या बाबत माझ्या मनात किंचिंतही शंका नाही.आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत

शरदवाडी, वडनेर अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिला. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. दरम्यान, यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. मंत्री दिलीपराव वळसे पाटील आजारी असले तरी त्यांचे सर्व मतदार संघातील बाबींवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे व आपले मताधिक्य जास्तीत-जास्त कसे वाढेल हे पाहावे.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, अरुण गिरे, मानसिंग पाचुंदकर,राजूशेठ गावडे, सुभाषशेठ पोटे, सावित्राशेठ थोरात, निलेशराव पडवळ, राजेंद्र गावडे, भाऊसाहेब औटी, शुभांगी पडवळ, बिपीन थिटे, डाँ. सुभाष पोकळे, हरिभाऊ सरोदे, विठ्ठल सरोदे, जनार्दन सरोदे, गणेश गांजे, पोपट गांजे, गणेश सरोदे वडनेर खुर्द येथील बाबाजी निचीत, नवनाथ खुर्द, विक्रम निचीत, दीपक हराळ, योगेश निचीत, अनिल वाजे, अनिल निचीत, रतन निचीत, ओमकार पानमंद, बाळू ढोबळे, विनायक चौधरी, विक्रम निचीत,बाळू ढोबळे आदी उपस्थित होते.

आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत
आढळराव पाटलांचे शरदवाडी व वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत