गुडनाइटने केलेल्या सर्व्हेनुसार डास चावल्याने उत्पादनावर होतोय वाईट परिणाम
अर्ध्यापेक्षा जास्त भारताच्या (५८%) उत्पादनक्षमतेवर डास चावून होणाऱ्या झोपमोडीमुळे परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. अपुरी झोप झाल्यामुळे त्यांना जास्त थकवा आल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने गुडनाइट या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) या भारतातील घरगुती कीटकप्रतिबंधक उत्पादनाने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये दिसून आले. गुडनाइटने YouGov या बाजारपेठेविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेसह गुडनाइटने संपूर्ण भारतात हा सर्व्हे केला. त्यामध्ये सार्वजनिक वर्तन, डासांमुळे होणारे रोग यांचे विश्लेषण केले गेले.गुडनाइटने केलेल्या सर्व्हेनुसार डास चावल्याने उत्पादनावर होतोय वाईट परिणाम
भौगोलिक प्रदेशानुसार पश्चिम भागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांचा त्यात समावेश असून तेथील ग्रस्त नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या राज्यांतील एकूण ६७ टक्के लोकांना डासांमुळे वारंवार झोपमोड होऊन त्याचा परिणाम आपल्या उत्पादनक्षमतेवर होतो असे वाटते. असे वाटणाऱ्या ५७ टक्के लोकांसह दक्षिण भारत दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर त्यानंतर उत्तर भारतातील चंदीगढ, दिल्ली, हरियाण आणि उत्तर प्रदेश ५६ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पूर्व भागात हे प्रमाण ४९ टक्के आहे.
अश्विन मूर्ती म्हणाले, ‘ गुडनाइटच्या ‘वन मस्किटो, काउंटलेस थ्रेट्स’ या राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सार्वजनिक वर्तन आणि डासांमुळे आजारांचे विश्लेषण मांडण्यात आले आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून भारतात डासांमुळे होणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे व त्यांना वाजवी तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजना उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. भारतात दरवर्षी ४० दशलक्षांपेक्षा जास्त नागरिकांना डासांमुळे मलेरिया, डेंग्यु अशा आजारांचा सामना करावा लागतो. आजारामुळे शाळा, सामाजिक उपक्रम, काम, व्यावसायिक बांधिलकीतून त्यांना रजा घ्यावी लागते. यामुळे आरोग्यसेवांवरचा खर्च वाढतो तसेच उत्पादनक्षमता कमी होते. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता कायम राखण्यासाठी आणि जीडीपी स्कोअर चांगला राखण्यासाठी मनुष्यबळ निरोगी असणे महत्त्वाचे आहे.
देशभरात दोनपैकी एका प्रौढ व्यक्तीच्या (५० टक्के) झोपमोडीच्या कारणांमध्ये डास हे प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे, पश्चिम भारत (५६ टक्के) याच्याशी सहमत असून हे प्रमाण उत्तरेकडे (५२ टक्के), दक्षिणेत (४७ टक्के) आणि पूर्वेकडे (४२ टक्के) आहे. त्याशिवाय स्त्रियांच्या तुलनेत (४६ टक्के) पुरुषांमध्ये याविषयी जास्त सहमती (५४ टक्के) आहे.
गुडनाइट सातत्याने डासांमुळे होणाऱ्या आजारांविरोधात जागरूकता पसरवण्यासाठी सक्रिय राहिले असून या धोकादायक कीटकाविरोधात राष्ट्रीय लढ्यात मोठे योगदान देत आहे. ब्रँडने दीर्घकाळापासून डासांविरोधात नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यात फ्लॅश व्हेपरायझर, आधुनिक पद्धतीचे फास्ट कार्ड यांचा समावेश आहे. अशाप्रकारची उत्पादने उपलब्ध करून देत कंपनीने डासांपासून कित्येक कुटुंबांचे संरक्षण केले आहे.
Link to the report: Goodknight Report: One Mosquito, Countless Threat