Latest News

देशाची निवडणूक असल्याने आढळराव पाटलांना निवडून द्या – अजित पवार

Share Post

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात अवघे दोन दिवस प्रचारासाठी उरले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेत त्यांच्याशी संवाद साधून कांदा नियांत बंदी उठवण्याची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. देशाची निवडणूक असल्याने आढळराव पाटलांना निवडून द्या – अजित पवार

आळंदी येथील फुटवाले धर्मशाळेच्या भव्य सभागृहात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्यास महायुतीचे घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली आत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी दिले. तसेच ही देशाची निवडणूक असल्याने आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले, आपण कोणत्याही प्रकारच्या शूटिंगला जाणार नाही. त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी तसेच मतदार संघातील उर्वरित विकास कामासाठी देणार आहे. आळंदी येथील देवस्थानच्या जागेत विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पुणे मेट्रो आळंदी पर्यंत आणण्यास प्रयत्न करायचे आहेत. मी  मतदारसंघासाठी पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे, यामुले निवडणुकीत  मतदारांनी कोणत्याही भूलथापांना  बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

देशाची निवडणूक असल्याने आढळराव पाटलांना निवडून द्या - अजित पवार
देशाची निवडणूक असल्याने आढळराव पाटलांना निवडून द्या – अजित पवार