Daily UpdateNEWS

कोल्हे डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय-अजित पवार

Share Post

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.कोल्हे डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय-अजित पवार

“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.

कोल्हे डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय-अजित पवार
कोल्हे डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय-अजित पवार