18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार - आमदार अतुल बेनके

आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार - आमदार अतुल बेनके

आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार – आमदार अतुल बेनके

Share Post

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले आहे.आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार – आमदार अतुल बेनके

आपल्या कार्यकाळात आढळराव पाटलांनी शिरूरसाठी भरपूर विकासकामे केली. सातत्याने मतदारसंघात फिरत लोकांच्या अडअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी त्यांचा पराभव केला. असे असले तरीही, यंदा नव्या जोमाने आढळराव पाटील मैदानात उतरले आहेत. शिरूरमधील जनतेसह आसपासच्या तालुक्यातील नेत्यांचाही त्यांना पाठींबा मिळताना दिसत आहे. 

नुकतेच जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी यंदा शिरूरमधून शिवाजीराव पाटीलच निवडणूक येणार असा विश्वास व्यक्त केला. जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिक शिवाजीदादांच्या पाठीशी उभे राहतील.

तीन पक्ष एकत्र असल्यामुळे जुन्नर तालुक्यातून अधिकतर मते शिवाजीदादांना पडतील. शिवाजी आढळराव पाटील हा काम करणारा माणूस आहे, त्यामुळे ते शंभर टक्के शिरूर लोकसभेतून विजयी होणार आहेत, असा विश्वास यावेळी अतुल बेनके यांनी व्यक्त केला.

आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार - आमदार अतुल बेनके

आढळराव पाटलांना जुन्नरमधून सर्वाधिक मते पडणार – आमदार अतुल बेनके