20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात

Share Post

आरोग्यक्षेत्रातील तंत्रज्ञ आणि सहाय्यक घडविणारी देशातील अग्रगण्य संस्था म्हणजे जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात सुरु झाली आहे. हांडेवाडी येथील गोल्डन नेस्ट येथे हि अकॅडेमी सुरु झाली असून याचे उद्घाटन राजस्थानमधील नोहरचे आमदार अमित चाचन आणि गोयंका हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मेहरा, माजी महापौर प्रशांत जगताप, कोठारी पब्लिक स्कुलचे संचालक मयूर शाह, पुणे फ्रँचायझी भागीदार पुनित गोल्यान, व्यवस्थापिका मैत्रेयी देशमुख यावेळी उपस्थित होत्या. आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात

मोहित मेहरा म्हणाले की, कोरोना काळात भारताच्या आरोग्य सेवा उद्योगात प्रशिक्षित पॅरामेडिक्सची मोठी कमतरता जाणवत आहे. या अकादमीच्या माध्यमातून आम्ही ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी डिप्लोमा, पदवी आणि मास्टर्ससाठी स्केलेबल आणि प्रमाणित अभ्यासक्रम तयार केले आहेत. जीडी गोएंका हेल्थकेअर अकादमी जवळपास 30 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असून देशात महाराष्ट्राव्यतिरिक्त 22 राज्यांमध्ये सुमारे 80 हून अधिक अकादमीच्या शाखा आहेत. आम्ही पदविका, पदवी आणि मास्टर्ससाठी स्केलेबल आणि प्रमाणित अभ्यासक्रम तयार केले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच केंद्र सुरू केल्याचा विशेष आनंद होत आहे.

मैत्रेयी देशमुख म्हणाल्या की, दहावी आणि बारावीनंतर गोंधळलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ७ डिप्लोमा आणि १२ पेक्षा अधिक प्रमाणित अभ्यासक्रमांद्वारे आरोग्य सेवेचे योग्य प्रशिक्षण या अकॅडेमीमार्फत दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने क्ष-किरण तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ, दंत सहाय्यक आणि इतर आरोग्य सहाय्यकांसाठी लागणारे तांत्रिक शिक्षण असणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी किमान दहावी उत्तीर्ण तर डिप्लोमा आणि पदवीसाठी किमान बारावी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी असे निष्कर्ष आहेत. विद्यार्थ्यांना रूग्णालयातील व्यावहारिक शिक्षणासह क्लिनिकल इंटर्नशिप देखील दिली जाणार असून १०० टक्के प्लेसमेंट सहाय्य देखील दिले जाईल. तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थी कोणत्याही व्याजदराशिवाय शैक्षणिक कर्ज घेऊ शकतील.GD Goenka Healthcare Academy

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि सहाय्यक घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात सुरु