महायुतीचे बारामतीनंतर पुणे लोकसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत
महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीची समजली जाणारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पाडलं. आता बारामतीनंतर पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पुण्यात आज महायुतीची महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.महायुतीचे बारामतीनंतर पुणे लोकसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच्यासंदर्भात योजना आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदान पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील पश्चिम मतदारसंघात प्रचार होणार आहे. यासाठी आता सगळीच यंत्रणा महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात आणल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.