10/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

१७ सप्टेंबर रोजीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन

Share Post

मराठवाडा समन्वय समिती पुणे च्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे, रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसह  ‘मराठवाडा भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री विवेकानंद भोसले , प्रमुख पाहुने म्हणून मा. श्री रामनाथ पोकळे यांचेसह आंतरराष्ट्रीय संशोधक, लेखक व विचारवंत डॉ.सुरज एंगडे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मराठवाडा समन्वय समिती पुणे’चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव दत्ताजी मेहेत्रे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, अरुण पवार आदी उपस्थित होते.

मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सायंकाळी ५.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या मराठवाडा भूषण पुरस्कारामध्ये प्रशासकीय सेवेतील भरीव योगदानाबद्दल मा.श्री.देविदास गोरे , कला साहित्यातील योगदानाबाद मा.श्री.आसाराम लोमटे, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मा.डॉ.बबन जोगदंड, तर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द प्राइड इंडिया’ ‘स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर’ यांना देण्यात येणार आहे ,उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल मा.श्री.अनिरुद्ध चव्हाण यांना तसेच विशेष सन्मान ऍड.जी.आर.देशमुख, परभणी. आदी मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.