10/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना - मुरलीधर मोहोळ

कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना - मुरलीधर मोहोळ

कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना – मुरलीधर मोहोळ

Share Post

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येत असून, त्या माध्यमातून स्थानिक आणि देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना – मुरलीधर मोहोळ

मोहोळ यांनी आज पु. ल. देशपांडे उद्यानात सकाळी फिरायला आणि व्यायामाला येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन प्रचार केला. आमदार माधुरी मिसाळ, अनिता कदम, आनंद रिठे, महेश वाबळे, प्रशांत दिवेकर, जीतेंद्र पोळेकर, विनया बहुलीकर यावेळी सोबत होते.

मोहोळ म्हणाले, ‘दिल्ली हटच्या धर्तीवर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी 200 नागरिक बसू शकतील इतक्या क्षमते आसन व्यवस्था असणारे ॲम्फिथिएटर, अल्पोपहार केंद्र उभारण्यात येत आहे.’

कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना - मुरलीधर मोहोळ
कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना – मुरलीधर मोहोळ