जागतिक पुस्तक दिनानिमित्त दादाच्या शाळेतील मुलांना पुस्तकांची भेट
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे जागतिक पुस्तक महोत्सवानिमित्त अभिजित पोखर्णीकर, शुभम माने यांच्या दादाची शाळा उपक्रमातील मुले, ज्येष्ठ नागरिकांना पुस्तकांचे वाटर करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, किशोरचे संपादक किरण केंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संजय चाकणे या वेळी उपस्थित होते. मुलांचा जाहीरनामा सुनील पांडे, प्रसेनजित फडणवीस यांना देण्यात आला. भांडारकर संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.जागतिक पुस्तक दिनानिमित्त दादाच्या शाळेतील मुलांना पुस्तकांची भेट
डॉ. सोनावणे म्हणाले, की मिळेल ते वाचले पाहिजे आणि लक्षपूर्वक वाचले पाहिजे. एकाचवेळी वेगवेगळी पुस्तके वाचता येऊ शकतात. तसेच इतरांना वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. वाचनातून दररोज एक नवीन शब्द शिकला पाहिजे.
पुस्तकाच्या वाचनाची आवड हळूहळू लागते. वाचनाने आत्मविश्वास वाढतो, द्नान मिळते, आयुष्य बदलून जाते. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणे पुस्तक ही मुलभूत गोष्ट आहे, वाचणारा माणूस चांगला माणूस होतो, असे किरण केंद्रे यांनी सांगितले.
काळकर म्हणाले, की रोज काहीतरी वाचले आणि लिहिले पाहिजे. लिहू, वाचू आणि व्यक्त करू शकतो हे माणसाचे वेगळेपण आहे. माणूस जन्माला येताना कोरी पाटी घेऊन येतो आणि पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात.