18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध

Share Post

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध घेताना हनुमानाने लंकेत पोहोचण्याच्या आड येणाऱ्या आव्हानांवर मात केली

श्रीराम कथा विशद करणाऱ्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. यापुढच्या सुंदरकांड अध्यायात प्रेक्षक बघतील की, सीतेला शोधून श्रीरामाचा संदेश तिला देण्याच्या कामगिरीवर निघालेला हनुमान आपली निष्ठा, शौर्य आणि हुशारी दाखवून मार्गक्रमण करत आहे.

हनुमानाच्या मार्गात असंख्य अडचणी आहेत पण तो त्यातून मार्ग काढेल. त्याला आडवा आलेला उंचच उंच मैनाक पर्वत, त्याला संपूर्ण गिळंकृत करायला टपलेली सुरसा ही समुद्री राक्षसी, आणि हनुमानाची सावली पकडून त्याला गिळू पाहणारी सिंहिका या सगळ्यांना आपल्या हुशारीने मात देत हनुमानाचा प्रवास सुरू आहे. लंकेच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर लंकेची सुरक्षा देवता लंकिणीशी त्याचा सामना होतो. तुंबळ युद्धात तो आपल्या अतुल्य बळाने तिला हरवतो आणि इथूनच रावणाच्या सम्राज्याची पडझड सुरू होते.

लिंक: https://www.instagram.com/reel/C6REHDJPbGS/?igsh=b3JvMHRicjh3bXNx

कथानकातील या महत्त्वाच्या भागाविषयी आणि हनुमानाच्या दृढ निर्धाराविषयीबोलताना महावीर हनुमानाची भूमिका करत असलेला निर्भय वाधवा म्हणतो, “सुंदरकांड अध्यायात हनुमानाची रामाच्या चरणी असलेली अढळ निष्ठा आणि रामसेवा करताना त्याची तत्परता दिसून येते. आपल्या सामर्थ्याने समुद्र पार करत असताना त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात, पण रामाप्रती असलेली त्याची अढळ निष्ठा त्याला प्रत्येक वेळी अनोखे बळ देते आणि तो त्या संकटातून मार्ग काढतो. या विशेष भागाचे शूटिंग करणे खूप रोमांचक होते. आणि आता यापुढे, या मालिकेत सुष्ट आणि दुष्टाच्या लढाईत असे अनेक क्षण प्रेक्षकांना बघायला मिळतील.”

या आठवड्यात ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत बघा, ‘सुंदरकांड अध्याय’, रात्री 9.00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध
‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध