खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वृद्धाश्रमात मतदार जागरूकता कार्यक्रम संपन्न
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातर्फे मतदार जागरूकता वाढवण्यासाठी ‘स्वीप’ (Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमाअंतर्गत शांतीबेन वृद्धाश्रमात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदार जागरूकतेचे महत्त्व वृद्ध मतदारांना समजावून सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वृद्धाश्रमात मतदार जागरूकता कार्यक्रम संपन्न
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार किरण सुरवसे, सचिन आखाडे,अंकुश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी शरदचंद्र गव्हाळे व सहाय्यक अधिकारी अमोल पिसाळ यांनी केले. वृद्धाश्रमातील नागरिकांना मतदान प्रक्रिया, त्याची पारदर्शकता आणि मतदान गुप्ततेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या सत्रात उपस्थित वृद्धांना मतदान प्रक्रियेशी संबंधित शंका निरसनाची संधी देण्यात आली.
तसेच यावेळी झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी विनोद हाके आणि प्रदीप पारखी यांचीही उपस्थिती होती. त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, जसे की वाहतूक सुविधा, व्हीलचेअर, सहाय्यक व्यवस्था आणि स्वतंत्र प्रवेश याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष श्रीमती देवकर व राष्ट्रीय दिव्यांग स्विमिंग चॅम्पियन श्रीमती शृंगारी भवसार ह्यांचीही उपस्थिती होती.
या उपक्रमातून खडकवासला मतदारसंघातील वृद्ध मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि त्यांची सजगता वाढवण्यात आली.