NEWS

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा

Share Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जर्सी सिटी मधील सिटी हॉलमध्ये विशेष ध्वजारोहन करण्यात आले. या समारंभात अमेरिकेच्या राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीने सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या निळा ध्वजाचेही दिमाखात ध्वजारोहन करण्यात आले होते.

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा
अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा
अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा

शहराच्या समानतेच्या तत्त्वांशी एकता दर्शवणारा असा आनंदाचा क्षण होता. कार्यक्रमावेळी कौन्सिलवुमन मीरा प्रिंझ-एरे आणि कौन्सिलमन जेम्स सोलोमन उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडत असतो. ध्वजारोहनाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM) ही भारताबाहेरील आंबेडकरी जनतेची सर्वात जुनी संघटना, जर्सी सिटी हॉलच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा
अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा
अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत डौलाने फडकला निळा झेंडा