Daily UpdateNEWS

विज्ञान व अध्यात्मातून विश्वशांतीचा संदेश जगभर पोहचविला – डॉ.विश्वनाथ कराड

Share Post

आम्ही विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांतीचा संदेश जगभर पोहचविला. शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असे मत विश्वशांतीदूत डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले. अमेरिकेतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. कराड यांना मानद डी.लिट.पदवीने सन्मानित करण्यात याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते.विज्ञान व अध्यात्मातून विश्वशांतीचा संदेश जगभर पोहचविला – डॉ.विश्वनाथ कराड

संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान, युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा संदेश व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहचवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख व विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरूवार, २ मे २०२४ रोजी मायदेशी दाखल झाले.

डीलिट स्विकारल्यानंतर प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल या कालावधीत यूके आणि अमेरिका येथे रवाना झाले होते. या शिष्टमंडळात एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. महेश थोरवे व अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

अमेरिकेतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. कराड यांना मानद डी.लिट.पदवी
गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमेरिकेतील, उटाह राज्यातील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बीवाययूचे अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतूक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले.

विज्ञान व अध्यात्मातून विश्वशांतीचा संदेश जगभर पोहचविला – डॉ.विश्वनाथ कराड