Daily UpdateNEWS

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थन

Share Post

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते हातात ‘सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन चंद्रकांतदादांचे स्वागत करण्यात येत आहे.भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थन

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. सर्वच मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी कायम राखली आहे. आज कोथरुड मधील कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टीने चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कर्वेनगर मधील नटराज सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, भागातील कार्यकर्ते ‘चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागतार्थ सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ ‘माणसातील देव माणूस’ ‘मुलींना दिली शिष्यवृत्ती दादा म्हणजे कामाला गती’ अशा आशयाचे फ्लेक्स धरुन उभे धरुन उभे होते. तसेच ‘एक है तो सेफ है, भारतमाता की जय!’च्या घोषणांनी प्रत्येक चौक दणाणून गेला होता.

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, गिरीश खत्री, विशाल रामदासी, महेश पवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवरामपंत मेंगडे, अश्विनी ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या संगीता बराटे, रेश्मा बराटे, तेजल दुधाने, संतोष बराटे यांच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थन
भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थन