22/06/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ

भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ

भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ

Share Post
 • ज्या शहरांच्या ई-कॉमर्समध्ये वेगाने/सशक्त वाढ होते आहे अशा शहरांमध्ये बंगळुरू (93%), मुंबई (92%), चेन्नई (88%), कोलकाता (67%) आणि अहमदाबाद (57%) चा समावेश भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ
 • टिकाऊपणात वाढ, 40% किरकोळ विक्रेते (रिटेलर) ऊर्जा-कार्यक्षम स्टोअर डिझाईन स्वीकारतात. ज्यामुळे ब्रँडच्या प्रतिष्ठेत सुधारणा (47%) आणि स्पर्धात्मक फायदा (40%)
 • GI ग्रुप होल्डिंग इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार, सर्व किरकोळ विक्रेत्यांपैकी निम्म्याहून अधिक (52%) यावर्षी नवीन पदवीधर नियुक्त करण्याची योजना आखत आहेत आणि पाचपैकी दोन (38%) अनुभवी व्यावसायिकांना कामावर घेण्याचा विचार करीत आहेत.
 • जवळजवळ सर्व रिटेलर (83%) ना विक्री/ विपणनातील कौशल्य तूट बंद करण्याची इच्छा आहे. लॉजिस्टिक (77%) आणि तंत्रज्ञान/ विश्लेषणात्मक कौशल्यांची देखील खूप मागणी आहे.

 GI ग्रुप होल्डिंगच्या वतीने करण्यात आलेल्या “द ग्रेट इंडियन कन्झम्पशन स्टोरी” या ताज्या अहवालात किरकोळ विक्री, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमधील गतिशील परिस्थिती उलगण्यात आली. ज्यात विशेषतः तरुणांमध्ये नोकरी स्वारस्यात वाढ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जलद स्वीकार अधोरेखित झाला. कर्मचारी, संस्था आणि समाजाला लाभ देणारी परिवर्तनशील आणि समृद्ध कामगार बाजारपेठ निर्माण करणे हे या अभ्यासाचे अंतीम उद्दिष्ट आहे.

ग्राहकांच्या बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यवसायांची सज्जता होत असताना, भरती पद्धतींमध्ये एक उल्लेखनीय कल दिसून येतो. सर्व किरकोळ विक्रेत्यांपैकी निम्म्याहून अधिक (52%) नवीन पदवीधरांना यंदा ऑनबोर्ड करण्याची योजना आखण्यात येते आहे तर पाचपैकी दोन (38%) अनुभवी व्यावसायिकांची भरती करण्याचा प्रयत्न करतात. प्रतिभा संपादनावर भर दिल्याने उद्योगाची वाढ आणि नवोन्मेषाला चालना देण्याची बांधिलकी प्रतिबिंबित होते.

सन 2023 मध्ये, किरकोळ उद्योगाने नोकरी अर्जांमध्ये उल्लेखनीय 8% वाढ अनुभवली, तर मागणी 18% वाढली, जी किरकोळ भूमिकांमध्ये मजबूत स्वारस्य दर्शवते. जवळपास 86.86% अर्जदार हे 18 ते 30 वयोगटातील असल्याचे निष्पन्न जे तरुणांमध्ये किरकोळ व्यवसायाकडे तीव्र कल दर्शवितात. टियर-1 शहरे नोकरी शोधणाऱ्यांसाठी मुख्य केंद्र म्हणून उदयास आली आहेत. एकूण अर्जदारांची संख्या 58.49% असून त्यानंतर टियर-2 आणि टियर-3 शहरे रांगेत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले. हा वितरणाचा कल कायम राहण्याची अपेक्षा असून चालू उद्योगाची गतिशीलता प्रतिबिंबित करते.

याउलट, लॉजिस्टिक क्षेत्राला आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत सक्रिय नोकऱ्यांमध्ये 13.89% घसरणीचा सामना करावा लागला. पीक सीझनच्या वेळी पूर्ततेदरम्यानच्या आव्हानांमुळे हे घडले. तथापि, 2024 च्या सुरुवातीला नवीन नोकरीच्या संधीमध्ये 10.24% वाढ झाली, या वर्षाच्या शिखर हंगामापर्यंत निरंतर वाढीचे अंदाज आहेत.

या संशोधनानुसार, ई-कॉमर्स लक्षणीय वाढ अनुभवते आहे आणि सध्याच्या बाजारपेठेचा आकार रु 8.2 ट्रिलियनवरून 2030 पर्यंत रु. 26 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हा आश्चर्यकारक विकासाचा मार्ग भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटल व्यापाराची वाढती प्रमुख भूमिका अधोरेखित करतो. याव्यतिरिक्त, कोविड-19 नंतरच्या वर्षांत किरकोळ वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याला प्रामुख्याने  Gen Z  आणि महिला जबाबदार आहेत. या वाढीमध्ये त्यांचा 42% वाटा आहे. या घटकाची बदलत्या प्राधान्ये आणि खरेदीच्या सवयींनी किरकोळ क्षेत्राला नवीन आकार दिला आहे. ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रात नवकल्पना आणि कस्टमायजेशन झाले आहे.

मात्र, या वाढीदरम्यान आव्हाने कायम आहेत. अहवालात कौशल्य विकासाची तीव्र गरज अधोरेखित करण्यात आली, सुमारे 83% किरकोळ विक्रेत्यांनी विक्री/ विपणनातील कौशल्य तूट बंद करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर लॉजिस्टिक (77%) आणि तंत्रज्ञान/ विश्लेषणात्मक कौशल्ये. वाढत्या डिजिटल बाजारपेठेत वाढ आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी ही दरी भरून काढणे महत्त्वाचे आहे.

किरकोळ आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील वाढ आणि कार्यक्षमतेसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब हा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास येतो. उच्च वाढीचा अनुभव घेणारे व्यवसाय उच्च पातळीवरील तंत्रज्ञानाचा अवलंब दर्शवतात, खर्च कमी करणे, इन्व्हेंटरी व्यवस्थापित करणे आणि वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यामध्ये त्याच्या भूमिकेवर जोर देतात.

तंत्रज्ञानाचा परिवर्तनात्मक प्रभाव ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या पलीकडे लॉजिस्टिक कंपन्यांपर्यंत विस्तारतो, जे शेवटच्या मैलाच्या वितरणासाठी क्लाउड सोल्यूशन्स (54%) आणि AI ऑटोमेशन (37%) कडे वळत आहेत. पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी आयओटी (40%) चा लाभ घेणे उद्योगाची नाविन्य आणि कार्यक्षमतेसाठीची वचनबद्धता अधोरेखित करते. कोविड-19 नंतर, ई-कॉमर्स आणि संबंधित अॅप्सच्या मागणीत सातत्याने वाढ झाली आहे. ज्यामुळे अन्न आणि किराणा मालाच्या मागणीनुसार वितरण करणाऱ्या अॅप्सना मागे टाकले आहे. ग्राहकांच्या वर्तनातील हा बदल डिजिटल कॉमर्स मंचांचे शाश्वत आकर्षण आणि सुविधा अधोरेखित करतो. जलद आणि निरोगी ई-कॉमर्स वाढ असलेल्या शहरांमध्ये बंगळुरू (93%), मुंबई (92%) आणि चेन्नई (88%) यांचा समावेश आहे.

GI ग्रुप होल्डिंगच्या कंट्री मॅनेजर सोनल अरोरा म्हणाल्या, “भारतातील रिटेल, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रात इंटरनेटचा वाढता वापर, स्मार्टफोनचा अवलंब आणि वाढता मध्यमवर्ग यासारख्या घटकांमुळे अभूतपूर्व वाढ झाली आहे. या वाढीमुळे विशेषतः द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये शेवटच्या टप्प्यातील वितरण आव्हाने हाताळण्यासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक उपायांची मागणी वाढली आहे. व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी ई-कॉमर्स आणि किरकोळ क्षेत्रातील दिग्गज आणि स्टार्टअप्स तंत्रज्ञान-चालित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, ज्यात गोदामे, पूर्तता केंद्रे आणि वितरण नेटवर्क यांचा समावेश आहे. तरीच नवकल्पना आणि गुंतवणुकीसाठी फायदेशीर संधी उपलब्ध करून देत, हे क्षेत्र वेगाने विकसीत होत आहे.

आमच्या अहवालाचा उद्देश उद्योग वाढीची गतिशीलता, उदयोन्मुख ग्राहक कल आणि व्यवसायांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करणे हा आहे. याव्यतिरिक्त, हे तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका, भारताच्या कामगारांना उपलब्ध असलेले वैविध्यपूर्ण करिअर मार्ग आणि किरकोळ आणि लॉजिस्टिकमधील शाश्वत पद्धतींच्या दिशेने महत्त्वपूर्ण संक्रमण यावर देखील प्रकाश टाकेल.”

रोजगार क्षेत्रातील उदयोन्मुख कलः

नोकरीचे कल बदलत आहेतः किरकोळ विक्री वाढत आहे, वैयक्तिकृत सेवेद्वारे चालवली जात आहे; पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे लॉजिस्टिक मंदावत आहे आणि बदलत्या मागण्यांशी जुळवून घेण्यासाठी ई-कॉमर्स निवडक भरती करते आहे.

 • 2023 मध्ये, किरकोळ नोकरीच्या अर्जांमध्ये 8% वाढ झाली, तर मागणी 18% वाढली. विशेष म्हणजे 86.86 टक्के अर्जदार 18 ते 30 वयोगटातील होते
 • याउलट, श्रेणी-1 शहरांमध्ये अर्जदारांचा सर्वाधिक ओघ दिसून आला, जो एकूण 58.49% आहे, त्यानंतर श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांचा क्रमांक लागतो. ही वितरण पद्धत चालू वर्षभर चालू राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे उद्योगातील चालू कल प्रतिबिंबित होतात.
 • वितरण सेवा आउटसोर्स करणारे ई-कॉमर्स व्यवसाय मुख्यतः खर्च कमी करण्यासाठी (24%) विक्री आणि विपणनावर अधिक लक्ष केंद्रित करतात (20%) आणि त्यांच्या व्यवसायाचे स्केलिंग सुलभ करतात (15%)
 • लॉजिस्टिक क्षेत्रात पीक सीझनच्या पूर्ततेदरम्यान आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत सक्रिय नोकऱ्यांमध्ये 13.89% घट झाली. तथापि, 2024च्या सुरूवातीस नवीन नोकरी पोस्टिंगमध्ये 10.24% वाढ झाली आणि या वर्षी पीक सीझनपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
 • वैविध्यपूर्ण नोकरभरती (डायव्हर्सिटी हायरिंग)वर लक्ष केंद्रित करण्यात आले असून 30% किरकोळ विक्रेते हे महिला उमेदवारांच्या शोधात आहेत आणि 40% ई-कॉमर्स कंपन्या DEI उपक्रमांना प्राधान्य देत आहेत
 • AI आणि ऑटोमेशनच्या बाबतीत, लॉजिस्टिकच्या 37% च्या तुलनेत ई-कॉमर्स 56% अॅडोप्शन रेटने आघाडीवर आहे
 • कोविडपश्चात, ई-कॉमर्स आणि संबंधित अॅप्समध्ये (55%) अन्न आणि किराणा (45%) साठी ऑन-डिमांड डिलिव्हरी अॅप्सच्या तुलनेत मागणीत किंचित जास्त वाढ
 • क्षेत्रात सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स (67%) सौंदर्य आणि वैयक्तिक निगा (46%) आणि फॅशन आणि जीवनशैली (42%) महामारी दरम्यान आणि नंतर बदलत्या ग्राहकांचे कल प्रतिबिंबित करतात.

हा अहवाल उद्योगातील भागधारक, धोरणकर्ते आणि गुंतागुंतीतून मार्गक्रमण करू इच्छिणाऱ्या आणि भारताच्या किरकोळ तसेच ई-कॉमर्स क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या संधींचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी एक आराखडा म्हणून काम करतो.

अहवाल डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक कराः https://www.gigroupholding.com/india/the-great-indian-consumption-story/

भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ
भारतीयांच्या उपभोगाची कथा:किरकोळ विक्री,ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये एकत्रित वाढ