NEWS

स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीरव्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

Share Post

स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दुकान, उत्कृष्ट विक्रेता, फिनिक्स पुरस्कार, उत्कृष्ट महिला व्यापारी आणि कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीरव्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडीत, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, सुनील शिंगवी, राजकुमार गोयल, धनंजय रामलिंगे आदी उपस्थित होते.

सचिन जोशी म्हणाले, पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदा २७ वे वर्ष आहे. दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापाºयांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यंदाच्या वर्षी उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी.आर.गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पेश टेÑडर्सचे राजेश शहा व कल्पेश शहा, फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकीता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदन करण्यात येणार आहे. याशिवाय कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील गीता ओक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.

दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गिरीकंद ट्रॅव्हल्स चे विश्वास जोशी, गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अ‍ँड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्र्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर ट्रेडिंग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा, बेकलाईट कंपनीचे सचिन शामसुंदर मालपाणी आदींना व्यापार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर  व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन