17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

'दी डॉग्ज सेपरेशन' सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच चित्रपटगृहात

'दी डॉग्ज सेपरेशन' सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच चित्रपटगृहात

‘दी डॉग्ज सेपरेशन’ सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच चित्रपटगृहात

Share Post

कोरोना महामारीने आख्या जगाला हलवून ठेवले. या महामारीत मध्ये कित्येक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र ही कोरोना महामारी नैसर्गीक नसून ती मानव निर्मित असल्याचा दावा लेखक, दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी विविध पुराव्यांच्या आधारे केला आहे. याच धर्तीवर आंग्रे यांनी ‘दी डॉग्ज सेपरेशन” हा सत्य घटनेवर आधारीत सस्पेन्स थ्रीलर हिंदी सिनेमा तयार केला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दी डॉग्ज सेपरेशन’ सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच चित्रपटगृहात

‘डीप सी मुव्हीज’ची निर्मित ‘दी डॉग्ज सेपरेशन’या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी केले आहे. आंग्रे म्हणाले, कोरोना महामारीने संपूर्ण जगावर नागरिकांवर खोलवर परिणाम केले आहेत. कोरोना नंतर जसे काही चांगले बदल झाले तसे काही वाईट परिणाम झाले. घटस्फोट घेण्याकडे, एकटे राहण्याकडे  तसेच  विना आपत्य वैवाहिक आयुष्य जगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे; असे जागतिक आकडेवारी वरून सिद्ध आले आहे. अन् याच मुद्द्यावर ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा  चित्रपट भाष्य करतो. 

‘दी डॉग्ज सेपरेशन’ सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच चित्रपटगृहात

या चित्रपटासाठी रिसर्च करताना अशा अनेक बाबी लक्षात आल्या की ज्यावरून असे दिसून येते की ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायसेशन’ (WHO)ला या महामारीबद्दल आगोदार पासून माहिती होती अन् त्यांनी यासाठी एक प्रोग्राम देखील राबविला होता. अशा अनेक सत्य घटनांचा संदर्भ घेत कोरोना महामारी कशी नैसर्गीक नसून ती मानव निर्मित आहे, हे समजावून सांगण्याचा  हा चित्रपट प्रयत्न करतो, असे ही दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी सांगितले.       The Dog’s Separation

ही कथा एका हाय प्रोफाईल घटस्फोटापासून सुरू होणार आहे. जी मायक्रोसॉफ्ट चे सर्वेसर्वा  बिल गेट्स यांच्या घटस्फोटाशी मिळती जुळती आहे. जसजशी ही कथा कोणत्या वळणावर कशा प्रकारे सत्य घटनांचा खुलासा करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच यामध्ये अभिनेता आदित्य अलंकार, लीना नंदी, मिथिला नाईक, त्रिशन कुमार, केतन महाजन, नूपुर पंडित, निखिल घमरे, शुभम साखरे, तनिष्क खन्ना, दीपक जोशी, सुवदन आंग्रे, रोहन लोलगे, अभिर आणि आयुष चिंचाळकर आणि जिमी-द डॉग आदी कलाकारांनी काम केले आहे. सिनेमाचे संगीत संगीतकार युग भुसाळ यांचे असून निर्मातीची जबाबदारी दीपाली आंग्रे यांनी पेलली आहे.