Daily UpdateNEWS

विविध सामाजिक उपक्रमांनी समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

Share Post

जनसेवक तसेच भावी नगरसेवक समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असंख्य केकची अनोखी भेट त्यांना दिली.विविध सामाजिक उपक्रमांनी समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून महानगरपालिका अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना दात देत नसल्याने परिवर्तन हेल्पलाइन चे लोकार्पण देखील याप्रसंगी करण्यात आले. ही हेल्पलाइन गोरगरीब नागरिकांच्या मदतीस 24 तास सुरू राहणार असल्याचे युवा नेते सुरज समाधान शिंदे यांनी सांगितले.

वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडिया माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील दिग्गज नेते मंडळीनेदेखील समाधान भाऊ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा. आमदार सिध्दार्थदादा शिरोळे, मा. आमदार बापुसाहेब पठारे, आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर, बड्डुतात्या गायकवाड, अदित्य माळवे, सन्नीदादा निम्हण,पुथ्वीराज सुतार,मधुकर मुसळे,प्रकाश ढोरे,सचिन तावरे,दत्ता बहीरट,दत्तादादा खाडे,मनिष आनंद,दत्ताभाऊ सागरे, बाळासाहेब दाभेकर,आनंद छाजेड,राजु साने,बाळासाहेब बोडके, निलेश आल्हाट,दयानंद इरकल,इक्बाल शेख,संतोष लांडगे,ज्ञानेश्वर मोझे, विनायक बालगुडे,अशोक पवार,प्रकाश सोरटे,बाबासाहेब जंराडे,बाळासाहेब शिंदे, कैलास पवार ,नाना गव्हाणे उपस्थित होते.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन समस्त संगमवाडी ग्रामस्थ,उत्सव कमिटी आणि समाधान भाऊ शिंदे मित्रपरिवार नातेवाईक यांच्या वतीने करण्यात आले होते.

विविध सामाजिक उपक्रमांनी समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस साजरा