Daily UpdateNEWSPune | NEWS

अनधिकृत पब/लेट नाईट हॉटेल्स वर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – मा.दीपक मानकर

Share Post

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये विविध भागात अनधिकृत पणे चालणारे पब, रूफ टॉप हॉटेल्स, लेट नाईट हॉटेल्स यांवरती कडक कारवाई करून पुढील ८ दिवसात हे त्वरित बंद करण्यात यावेत अन्यथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी दिला आहे.अनधिकृत पब/लेट नाईट हॉटेल्स वर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – मा.दीपक मानकर

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडत आहेत.त्याला तरुण-तरुणींची अनधिकृतपणे सुरु असलेल्या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स मुळे होत असलेली नाईट-लाईफ हे कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनांच्या अधीन जात असताना दिसत आहेत.
पुणे शहरातील युवक-युवतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून यांचे परिणाम अपघातांच्या माध्यमातून पुणे शहरात दिसून येत आहेत.

पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी विविध प्रकारची व्यसने खुलेआम करीत आहेत. त्यांना महाविद्यालयांच्या परिसरामध्येच व्यसनांसाठी लागणारे उत्तेजक पदार्थ खुलेआम मिळत आहेत त्यावर कडक कारवाई व्हावी. तसेच पुणे शहरातील तरुणाई व्यसनाच्या जाळ्यात फसलेली असतानाच पुणे शहरामध्ये विविध भागात अनधिकृतपणे पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स चालत आहेत. त्याबाबत कसल्याच परवानगी घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दारू पिऊन होणारे गंभीर अपघात होणे, आग लागण्याच्या घटना घडणे, गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत.

प्रत्येकवेळी कारवाईचा बडग्याचा फार्स फक्त या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स च्या मॅनेजर व कर्मचारी यांच्यापुरता मर्यादित ठेऊन त्यांच्या मूळ मालकांना नेहमीच मोकळीक देण्यात येते. त्यामुळे कल्याणीनगर,विमाननगर,कोरेगाव पार्क, मुंढवा तसेच राजा बहादूर मिल परिसरातील 2 BHK यांसारखे असंख्य पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स मध्यरात्री उशिरापर्यंत चालू ठेवले जातात. अशा अनधिकृत आणि वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्सच्या मालकांवर कडक कारवाई करून त्या मालकांची नावे दैनिक वृतपत्रांमध्ये जाहीर करावीत अशी मागणी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अनधिकृत पब/लेट नाईट हॉटेल्स वर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - मा.दीपक मानकर
अनधिकृत पब/लेट नाईट हॉटेल्स वर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – मा.दीपक मानकर