Daily UpdateNEWS

भिन्न रक्तगट असताना किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

Share Post

वेगळा रक्तगट आणि अनेक रक्तवाहिन्या असलेल्या आव्हानात्मक अशा किडनी निकामी झालेल्या ४० वर्षीय महिला रुग्णावर पुण्यातील बाणेर स्थित मणिपाल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी यशस्वी रित्या किडनीबदलाची शस्त्रक्रिया केली आहे.भिन्न रक्तगट असताना किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

गृहिणी असलेल्या आरती मशाले यांना २०१५ पासून विविध प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या. त्यांच्या आजारपणाची सुरुवात ही एसएलई (सिस्टमॅटिक ल्युपस एरिथेमाटोसस) आणि दुर्बल रोगप्रतिकारशक्ती असलेल्या ल्युपस नेफ्रायटिस या आजाराच्या निदानाने झाली होती. पाच प्रकारच्या विविध औषधोपचार पध्दतींचा वापर करुनही त्यांचे हायपरटेन्शन हे नेहमीच अनिंत्रित होते. २०२० मध्ये त्यांचा आजार हा आणखी बळावून हर्पिस झुस्टर आणि मधुमेह यांचे निदान झाले. एप्रिल २०२१ मध्ये त्यांना किडनी निकामी होण्याची लक्षणे दिसू लागली, किडनी निकामी झाल्याने त्यांना २०२३ पासून डायलिसीस वर ठेवण्यात आले होते.

एकीकडे आरती यांची स्थिती खालावत असल्याने त्यांच्या किडनीचे रोपण करणे आवश्यक होते. त्यांचे पती राहूल मशाले (४३) यांनी त्यांच्या दोन किडन्यांपैकी एक देण्याची तयार दर्शवली. पण एबीओ इन्कॉम्पॅटिबिलीटी मुळे (रक्तगट न जुळणे) म्हणजेच राहूल यांचा रक्तगट एबी+ तर आरती यांचा रक्तगट ए+ असल्याने हा बदल खूपच आव्हानात्मक झाला होता. त्यानंतर अधिक तपासणी केल्यावर आणखी एक आव्हान समोर आले ते म्हणजे राहूल यांच्या किडनील मध्ये तीन रक्तवाहिन्या होत्या, अशी स्थिती ही जगभरांतील केवळ १० टक्के लोकसंख्येमध्ये आढळते. या सर्व आव्हानांवर मात करुन डॉ. तरुण जेलोका आणि डॉ. आनंद धारसकर आणि त्यांच्या टीमने १८ जुलै २०२४ रोजी यशस्वीपणे किडनी बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण केली.

या केस विषयी अधिक माहिती सांगतांना कन्सल्टंट युरोलॉजी डॉ. आनंद धारसकर यांनी सांगितले “ ही केस आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. प्रत्यारोपण करणे खूपच जटील होते कारण दात्याच्या किडनी मध्ये तीन रक्तवाहिन्या होत्या तर घेणार्‍या व्यक्तीकडे एकच रक्त वाहिनी होती. दात्याच्या तीन रक्तवाहिन्या जोडणे हे खूपच कठीण काम होते आणि म्हणूनच आम्ही लापारोस्कोपिक सजरी करुन किडनी बसवली, हा मार्ग खूपच कमी जखमेने युक्त, वेगाने बरा होणारा आणि सौंदर्य दृष्टिने सुध्दा चांगला असल्याने दात्यांकडूनही स्विकारला जातो. पण, किडनी घेणार्‍या रुग्णाकडे एकच रक्तवाहिनी असल्याने ही गोष्टही खूपच कठीण होती त्यामुळे अगदी अचूक रक्तपुरवठा प्राप्त करण्यासाठी वाहिन्यांची जोडणी करणेही आवश्यक होते.”

दोघांचे रक्तगट वेगळे असल्याचे आव्हान पार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कन्सल्टंट नेफ्रॉलॉजी आणि ट्रान्सप्लान्ट चे डॉ. तरुण जेलोका यांनी सांगितले. “ वेगळे रक्तगट असतांना ज्या निकषांचे पालन करावे लागते त्या निकषांनुसार आम्ही हे प्रत्यारोपण केले. रिजेक्शनचा धोका कमी करण्यासाठी आम्ही रुग्णाला मोनोक्लोनल ॲन्टीबॉडी ची औषधे ही प्रत्यारोपणाच्या दोन आठवडे आधीपासून सुरु केली, त्यानंतर एक आठवडा आधी अधिकची औषधे दिली. रक्तातील घातक घटक काढून टाकण्यासाठी आम्ही आणखी एक प्रक्रिया केली जिला प्लाज्मा एक्सचेंज असेही म्हणतात. ज्यामुळे तो स्तर सुरक्षित स्तरापर्यंत आला. अधिक धोका असूनही प्रत्यारोपण हे मॅच केल्याप्रमाणे यशस्वी झाले. रुग्णाची किडनी दोन दिवसात साधारण झाली आणि कोणत्याही समस्ये शिवाय रुग्ण घरी गेला.”

दात्याला ७ दिवसांत घरी सोडण्यात आले तर रुग्णाला प्रक्रियेनंतर ९ दिवसांनी घरी सोडण्यात आले. दोघांचा बरा होण्याचा काळ हा प्रत्यारोपणासाठी सारखाच असणार असून तो म्हणजे दात्यासाठी २-४ आठवडे आणि रुग्णासाठी ६-१२ आठवडे इतका आहे. दोन्ही दाता आणि रुग्ण सामान्य जीवन जगणे अपेक्षित आहे. पण रुग्णाला प्रत्यारोपणाशी संबंधित औषधे आयुष्यभर घ्यावी लागणार आहेत.

प्रत्यारोपणाच्या टीम मध्ये डॉ. तरुण जेलोका, डॉ. आनंद धारसकर, डॉ. सौरभ खिस्ते, डॉ. श्रीरंग रानडे, डॉ. निलेश वरवंतकर , डॉ. रणजीत महेशगौरी यांचा समावेश होता, तसेच ॲनेस्थेशियाच्या टीमचे नेतृत्व डॉ. आशीष पाठक यांनी केले होते.

भारतात २०२२ मध्ये आपल्या जोडीदारांना अवयव देणार्‍या दात्यांमध्ये ७१ टक्के महिला होत्या आणि त्यांतील ९० टक्के या पत्नी होत्या. पुरुष हे घराचे कमवते सदस्य असल्यामुळे ते दान करण्यास तयार नसतात. पण आंम्हाला हे नमूद करायचे आहे की किडनी दान केल्याने आरोग्यावर कोणताही घातक परिणाम होत नाही आणि अशा कसेस मुळे पुरुष दात्यांसाठी सुध्दा एक उत्तम उदाहरण प्रस्थापित झाले आहे.

भिन्न रक्तगट असताना किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
भिन्न रक्तगट असताना किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी