18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस

दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस

दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस

Share Post

शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास साहेबांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोत माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस
दिलीप वळसे पाटलांची आढळरावांनी घेतली भेट,तब्येतीची विचारपूस