23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा

भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा

भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा

Share Post

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सध्या प्रचारही शिगेला पोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे दोघेही उद्या शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी दिवसभर भोसरी विधानसभेतील विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधणार आहेत.भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोशी आणि जाधववाडी भागात प्रचार करणार आहेत, दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुदळवाडी येथिल परिसरात प्रचार दौरा करणार आहे. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, मा. आमदार विलास लांडे, इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विजू फुगे, शरद बुट्टे पाटील, बाळा भागवत, वसंत बोराटे, कविता आल्हाट, उत्तम आल्हाट, किसन बावकर, मा. महापौर राहुल जाधव, अश्विनी जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत तळवडे, रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर त्यानंतर ३ ते ६ वाजेपर्यंत सेक्टर 22, निगडी, यमुनानगर व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत अजंठानगर, कृष्णानगर, पूर्णनगर, घरकूल, नेवाळेवस्ती या भागात प्रचार करणार आहेत.

भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा
भोसरी विधानसभेत अमोल कोल्हे आणि आढावराव पाटलांचा प्रचार दौरा