Daily UpdateNEWS

NAREDCO च्या महिलांसाठी ‘माही’च्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी स्मिता पाटील यांची निवड.

Share Post

नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) माहीची स्थापना केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील महिला उद्योजकांना त्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘माही’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांमधील क्षमता, समन्वय आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी तसेच महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मक रित्या ‘माही’ मधून प्रयत्न करण्यात येतो.’माही’ या राष्ट्रीय पातळीवरील अध्यक्षपदाचा कार्यभार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल शेरटॉन ग्रॅण्ड, राजाबहादूर मिल रोड, पुणे १ येथे NAREDCO चे चेअरमन मा. निरंजन हिरानंदाणी यांच्या हस्ते स्विकारणार आहेत. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. शेखरसिंग, कॉसमॉस बँकेच्या महाव्यवस्थापक अपेक्षिता तिपसे, सिम्बायोसिसच्या प्र. कुलगुरू मा. डॉ. विद्या येरवडेकर, प्रसिद्ध कलाकार मा. देव गिल उपस्थित राहणार आहेत.