Daily UpdateNEWS

सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार

Share Post

 सह्याद्रि हॉस्पिटल्सला प्रगत व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आशियातील पहिली टोमोथेरपी Radixact X9 प्रणाली सादर करताना अभिमान वाटत आहे. हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रेडिएशन थेरपीमधील नवीनतम प्रगतीचे प्रतिनिधित्व करते; ज्यामुळे रुग्णांना अतिशय अचूक थेरपी आणि अधिक परिणामकारक उपचार मिळतात. खासकरून ज्या कॅन्सरमध्ये मोशन मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते त्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरत आहे.सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार

सह्याद्रि हॉस्पिटल्समधील लीड रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ संजय हुनुगुंडमठ यांनी माहिती दिली की, “ही सिस्टिम इमेजिंगच्या आधारे रिअल-टाइम अडॅप्टेशन पुरवते, त्यामुळे रेडिएशन डोस अगदी अचूकपणे टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचतो आणि निरोगी पेशींचे अकारण नुकसान टाळले जाते. श्वासासोबत हलणाऱ्या, खासकरून फुफ्फुसे आणि पोटातील ट्यूमरसाठी हे विशेष लाभदायक आहे. पुण्यामध्ये कॅन्सर रुग्णांना पुरवली जाणारी देखभाल आणि उपचारांमधील अचूकता यामध्ये या सिस्टिमने नवे मानक रचले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये अचूक पोझिशनिंग आणि सातत्यपूर्ण निगराणीसाठी रुग्णाच्या शरीरावर लाखो लेजर पॉईंट्स वापरले जातात, यामुळे उपचारांची अचूकता व परिणामकारकता वाढते.”

Radixact X9 सिस्टिम बहुउपयोगी आणि अचूक तर आहेच, शिवाय आता व्हायटलहोल्डमुळे तिची सक्षमता वाढली आहे. यामध्ये डीप इन्स्पिरेशन ब्रीथ होल्ड (डीआयबीएच) तंत्रामार्फत मोशन मॅनेजमेंटमध्ये लक्षणीय लाभ मिळतात. फुफ्फुसे आणि स्तनाच्या कॅन्सरसारख्या छातीतील अवयवांच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी हे खूप उपयोगी ठरते, कारण त्यामध्ये अचूक टार्गेटिंग आवश्यक असते. या सिस्टिममधील डीआयबीएच तंत्र ट्यूमर व आजूबाजूच्या पेशींची स्थिती स्थिर करते, त्यामुळे रेडिएशन अगदी अचूकपणे टार्गेटला पुरवले जाते, इतर निरोगी पेशींचे नुकसान कमीत कमी होते.

आशिया खंडामधील या सिस्टिमचे हे पहिले इन्स्टॉलेशन आहे आणिव्हायटलहोल्डचे सर्वात खास वैशिष्ट्य आहे ऑटो बीम होल्ड, उपचार सुरु असताना जर रुग्ण टॉलरन्स लिमिटच्या बाहेर जाऊन हालचाल करत असेल तर रेडिएशन डिलिव्हरी आपोआप थांबते. त्यामुळे अधिक जास्त सुरक्षा व अचूकता मिळते. या तंत्रज्ञानामध्ये इमेजिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे, त्यामुळे सुधारित सॉफ्ट टिश्यू कॉन्ट्रास्टसह हाय-डेफिनेशन इमेजेस मिळतात. त्यामुळे ट्यूमर अधिक अचूकपणे ओळखता येतात आणि उपचारांची अचूकता देखील वाढते. पारंपरिक इमेजिंग पद्धतींपेक्षा वेगळे हेलिकल केव्हीसीटी इमेजिंग या सिस्टिममध्ये वापरले जाते, गन्ट्री रुग्णाच्या भोवती फिरते आणि सतत हाय-रेजोल्यूशन इमेजेस मिळतात. त्यामुळे वेगवान इमेज ऍक्विजीशन मिळते, रुग्णाच्या हालचाली आणि इमेज आर्टिफॅक्टसची संभावना कमी होते.

सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ शोना नाग यांनी सांगितले, व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज Radixact X9 सिस्टिम असलेली जगभरात तीन सेंटर्स आहेतयामध्ये सह्याद्रि हॉस्पिटल्सचा समावेश आहेया विशेष तंत्रज्ञानामुळे सह्याद्रि हॉस्पिटल्सला कॅन्सर उपचारांमध्ये आघाडीचे स्थान मिळाले आहेअधिक चांगले परिणाम आणि अधिक चांगली जीवन गुणवत्ता मिळवून देणाऱ्या आधुनिक थेरपी रुग्णांना उपलब्ध करवून देणारे हॉस्पिटल ही सह्याद्रि हॉस्पिटल्सची ओळख अधिक मजबूत झाली आहेव्हायटलहोल्डशिवाय Radixact X9 चा स्टॅन्डर्ड इन्श्युरन्स पॅकेजेसमध्ये समावेश आहेयाचे वर्गीकरण इमेजगाईडेड रेडिओथेरपी म्हणून करण्यात आले आहेव्हायटलहोल्डसाठी विशेष कव्हरेज असावे यासाठी प्रयत्न केले जात आहेततसे झाल्यास प्रगत कॅन्सर देखभाल अधिक जास्त रुग्णांना उपलब्ध होईल आणि किफायतशीर देखील असेल.”

या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्यांच्यावर उपचार केले जातात अशा रुग्णांना अधिक जास्त आराम आणि परिणामकारता अनुभवायला मिळते कारण यामध्ये सेटअपची अचूकता वाढते आणि फिजिकल मार्कर्सची गरज कमी होते. हे तंत्र वापरायला अतिशय सोपे आहे, रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी उपचार कक्षात व्हिज्युअल क्यू असतात. जेव्हा रुग्ण आपला श्वास योग्य प्रकारे रोखून धरतो तेव्हा संपूर्ण कक्ष हिरवा होतो, त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी होते व ताण कमी होतो. अनेक प्रकारच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी हे तंत्रज्ञान अनुकूल आहे, छातीच्या पोकळीतील फुफ्फुसांचा, स्तनांचा कॅन्सर, पोटातील कॅन्सर (यकृत, अन्ननलिका), प्रॉस्टेट कॅन्सर इत्यादींच्या बरोबरीनेच पीडियाट्रिक ट्यूमर आणि टोटल बॉडी इरेडिएशन (टीबीआय) वरील उपचारांसाठी हे तंत्र उपयुक्त आहे. 

यावेळी बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अब्रारअली दलाल म्हणाले, आम्ही पुण्यात हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्या रूग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात सह्याद्रि नेहमीच आघाडीवर असते. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील आमच्या टीमने हे सखोल प्रशिक्षण घेऊन हे प्रगत तंत्रज्ञान स्वीकारले आहे. व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज Radixact X9 सिस्टिमच्या संपूर्ण क्षमता वापरून रुग्णांना सर्वोच्च देखभाल पुरवण्यासाठी व रुग्णांना जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

“या अनोख्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने ऑन्कोलॉजी केअरमधील आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला लक्षणीयरीत्या चालना मिळेल. या प्रगत उपचारांचा इन्श्युरन्स पॅकेजमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही परिश्रमपूर्वक प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे ते आमच्या रुग्णांसाठी सुलभ आणि परवडणारे देखील ठरेल.” असेही ते पुढे म्हणाले.

व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज Radixact X9 सिस्टिम लॉन्च करून सह्याद्रि हॉस्पिटल्सने कॅन्सरवरील उपचारांमध्ये एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र आणून अभिनव, अचूक व रुग्णकेंद्रित देखभाल पुरवण्यात सह्याद्रि हॉस्पिटलने आघाडीचे स्थान कायम राखले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार
सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार