फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 साठी नोंदणी शुभारंभ
फेडरल बँकेतर्फे येत्या 5 जानेवारी (रविवार) 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या नोंदणीस आजपासून शुभारंभ होत असल्याची घोषणा फेडरल बँकेतर्फे करण्यात आली आहे. स्ट्रायडर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील या प्रमुख स्पर्धेचा उद्देश पुण्याची विविधता, एकता साजरी करणे तसेच सक्रिय जीवनशैलीसाठी बँकेची असलेली वचनबद्धता प्रकट करणे, हा आहे.स्पर्धेचा तपशील:दिनांक : रविवार, जानेवारी 05, 2025स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणेगट : पूर्ण मॅरेथॉन (42 किमी), अर्ध मॅरेथॉन (21 किमी), 10 किमी आणि 5 किमी42 किमी पहाटे 4:00 वाजता21 किमी पहाटे 5:00 वाजता 10 किमी पहाटे 5:30 वाजता5 किमी सकाळी 6:15 वाजतानोंदणी शुल्क: 500 रुपयांपासून सुरु + जीएसटीसह नोंदणीची लिंक: https://www.federalbank.co.in/pune-marathon Federal Bank Pune Marathon 2024Get Ready for the Federal Bank Pune Marathon 2025! Kick-start Your Running Journey with the Federal Bank Pune Marathon on 5th January 2025www.federalbank.co.inनोंदणीची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2024.‘द सह्याद्री रन’ असे नामकरण करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट उलगडणार आहे. उत्साहाने सळसळणारे आणि फिटनेसला अनन्य साधारण महत्व देणाऱ्या पुणेकरांशी भावनिक बंध गुंफताना ही मॅरेथॉन समुदायाचा अभिमान फुलविण्याबरोबरच त्यांना स्वयंसुधारणांसाठी आणखी प्रेरित करत आहे. अनुभवी धावपटू असोत किंवा मैदानावरील आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे हौशी धावपटू असोत, प्रत्येकासाठी या मॅरेथॉनमध्ये शर्यतीचे खास गट आहेत. प्रसिद्ध फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 च्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुण्याची समुदाय भावना, आरोग्य आणि तंदुरुस्ती याला चालना देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध स्तरातील धावपटूंना मिलिंद सोमण यांच्या सहभागाने प्रेरणा मिळणार आहे. फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस मूर्ती म्हणाले, “फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे. फेडरल बँकेसाठी पुणे ही अतिशय महत्त्वाची विस्तारणारी बाजारपेठ आहे. आम्ही नागपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूरमध्ये आमचा व्यवसाय वाढत असताना तेथील मॅरेथॉन्समुळे स्थानिक समुदायाशी जोडण्याची आम्हाला संधी मिळत आहे. कॉस्मोपॉलिटन रुपामुळे पुण्याची इतर राज्यांच्या राजधान्यांशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन केवळ तेथील धावपटूंनाच पुण्याकडे आकर्षित करत नाही, तर त्यांच्या धावगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांनाही या शहरात आकर्षित करेल, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या बँकेतील सहकाऱ्यांनी अभिमान बाळगावा अशा पध्दतीने ते ग्राहकांना प्रदान करत असलेली सेवा आणि समुदायाशी आमचे घट्टपणे जुळलेले बंध याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. या सुंदर मॅरेथॉनसाठी तयार झालेला माहौल वातावरणनिर्मिती करेल, अशी मला खात्री आहे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि त्यांच्यासंदर्भातील माहितीची मी आतुरतेने वाट पाहत आहे.” एक ब्रँड म्हणून फेडरल बँक नेहमीच खेळ आणि फिटनेसचा प्रबळ समर्थक असून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे सातत्याने निरोगी जीवनशैलीचा प्रचार बँक करत आहे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉन हे क्रीडा आणि समाजाच्या कल्याणासाठी आमच्या वचनबद्धतेतील आणखी एक महत्वाचे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत, फेडरल बँकेने देशभरातील असंख्य मॅरेथॉन आणि क्रीडा स्पर्धांना प्रायोजकत्व आणि पाठबळ दिलेले आहे आणि त्याव्दारे सहभागास प्रोत्साहन देताना आरोग्य आणि निरोगीपणाची संस्कृती वाढवली आहे. खेळांमध्ये गुंतवणूक करताना व्यक्तींना सक्रिय जीवन जगण्यासाठी आणि फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे. ही अविस्मरणीय मॅरेथॉन अनुभव चुकवू नका. आता नोंदणी करा आणि आगाऊ नोंदणीसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घ्या