29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

'गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ'चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर

'गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ'चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर

‘गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर

Share Post

पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपसह एकदिलाने एकवटलेले महायुतीतील सर्व घटक पक्ष, मोहोळ यांच्या पदयात्रांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असे चित्र असताना दुसरीकडे कॉँग्रेस पक्षांतर्गत वाद मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची पाठ सोडायला तयार नाही. पुण्यात रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉँग्रेस भवन येथे आले असता त्यांच्या समोरच आबा बागूल यांच्या विरोधात बॅनर्स झळकावून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राजकीय वर्तुळात या प्रकाराची परत एकदा चर्चा सुरू झाल्याची पहायला मिळत आहे.’गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर

पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले आबा बागूल यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या घटनेनंतर थोरातांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ‘नाराजांकडे जाणे, त्यांच्याशी बोलणे हे आमचे काम आहे.’ आबा बागूल यांची नाराजी दूर होईल अशी आम्हला अपेक्षा आहे.’ असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, या प्रसारमाध्यमांशी संवादानंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेस भवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या हकालपट्टीची मागणी करत काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर झळकवले.’नागपूर येथे भाजप नेत्यांची भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध,’ अशा आशयाचे फलक झळकावले. तसेच, ‘गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा देण्यात आला.

रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत नाराजीने ग्रासले आहे. काँग्रेसच्या एका मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यावरून झालेला वाद, त्यानंतर नेत्याचा फोटो बॅनर वर नसल्याच्या कारणावरून थेट मंडपवाल्याला मारहाण झाल्याचा प्रकार, काँग्रेस ओबीसी सेल च्या पुणे शहराध्यक्ष पदावरून झालेला वाद,आबा बागुलांची नाराजी आणि आता पक्षाचे जेष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्याच दोन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर फलक झळकवत आबा बागुल यांची हकालपट्टीची मागणी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामागचा पक्षांतर्गत कुरघोडीचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नाही.

'गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ'चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर
‘गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा बागूल यांच्या विरोधात झळकावले बॅनर