पुणे मर्चंटस बँकेची कोंढवे धावडे येथे १४ वी शाखा
पुणे मर्चंटस को- ऑप बँक लि. च्या १४ व्या शाखेचे उद्घाटन एनडीए खडकवासला येथील कोंढवे धावडे येथे ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते झाले. बँकेने नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले असून उपनगरातील शाखा विस्तारातील हा महत्वाचा टप्पा आहे.पुणे मर्चंटस बँकेची कोंढवे धावडे येथे १४ वी शाखा
ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते उद्घाटन
यावेळी बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष ऍड. सुधीर शेळके, यांसह बँकेचे सर्व संचालक देखील उपस्थित होते.
रामदास फुटाणे म्हणाले, युवा पिढीला भविष्यामध्ये नोकरी मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे त्यांना उद्योजकतेची कास धरावी लागले. त्यासाठी समाजातून युवकांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. कर्ज योजनांच्या माध्यमातून अशा युवक-युवतींच्या पाठीमागे आपण बँक म्हणून भक्कमपणे उभे रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दीपक मानकर म्हणाले, सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम सहकारी बँकांच्या माध्यमातून केला जात आहे. प्रकाश ढेरे यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँकेला जनमानसात पोहोचविले. कोंढवे धावडे या भागात अनेक गरीब कुटुंब आहेत, त्यामुळे बँकेने नवीन शाखेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांकरिता मदतीचा हात देणाऱ्या योजना सुरु कराव्यात.
विजय ढेरे म्हणाले, बँकेने नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेची ही १४ वी शाखा असून २४६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेला अ वर्ग ऑडिट दर्जा असून सर्वार्थाने बँकेचा कारभार पारदर्शीपणे सुरु आहे. त्यामुळे कोंढवे धावडे भागातील रहिवाशांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.