Daily UpdateNEWSPune | NEWS

पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीचे हेमंत पाटील उमेदवार – सचिन पाटील

Share Post

पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे सांगत, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तोंडिसतोड देण्यासाठी पुण्यात इंडिया अगेंस्ट करप्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे पक्षाचे उमेदवार असतील.असे अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी हेमंत पाटील, अपनी प्रजा हित पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी सचिन पाटील म्हणाले, पुणे लोकसभेची उमेदवारी ऐतिहासिक असल्यामुळे कार्यकर्ते हेमंत पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. पुणे लोकसभा मतदारसंघात गोर गरिबांवर अन्याय होत आहे. आयटी हब असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही, व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. हे सर्व प्रश्नांन सोडवण्यात हेमंत पाटील यशस्वी ठरतील असा विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला. 

शिरसाट म्हणाले, राज्यात आम्ही अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत. त्यामध्ये पुणे, बारामती, सातारा, माढा, कोल्हापूर सह कोकण आणि मुंबईत आमचे उमेदवार मैदानात असतील.

पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीचे हेमंत पाटील उमेदवार - सचिन पाटील
पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीचे हेमंत पाटील उमेदवार – सचिन पाटील