Latest NewsNEWS

कसब्यात हेमंत रासने यांच्या बाईक रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Post

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा आज (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शेवट केंद्रीय राज्यमंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार रॅलीने झाला. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.कसब्यात हेमंत रासने यांच्या बाईक रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कासब्यातून रासने यांच्या विजयासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांसह महायुतीच्या सर्व सहकारी पक्ष कसब्यात कमळ फुलवण्यासाठी मेहनत घेत आहेत. यातच आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीमध्ये महायुतीच्या प्रमूख नेत्यांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

या रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहभागी झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे बळ वाढले. ठिकठिकाणी कसब्यातील जनतेकडूनही या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कसब्यात यंदा हेमंत रासने यांच्या विजय निश्चित आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कसब्यात हेमंत रासने यांच्या बाईक रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद