नृत्यांगण कथक अकादमीचा नृत्य महोत्सव उत्साहात साजरा
आधुनिक बॅलेचा जनक जीन जॉर्जेस नोरेन यांचा जन्मदिन २९ एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.नर्तकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दिनी विविध कार्यक्रमांमुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते.नृत्यांगण कथक अकादमीचा नृत्य महोत्सव उत्साहात साजरा
याचेच औचित्य साधून नृत्यांगण कथक अकादमीच्या वतीने नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल,धायरी येथे नृत्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या अकादमीला 41 वर्षे पूर्ण झाली असून काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम करण्यात आला. या उपक्रमाची प्रेरणा गुरुवर्य पंडित राजेंद्रजी गंगानी यांनी खजुराहो महोत्सव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले त्यातून मिळाली. ३०० नृत्यांगनांनी एकत्र येऊन कथक सादर केले.या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन रेश्मा गोडांबे यांचे होते.
रेश्मा गोडंबे म्हणाल्या, नृत्य महोत्सवाची तयारी आम्ही एक महिन्यापासून करत आहोत.रोज सराव करत होतो.संपूर्ण कार्यक्रमाचे श्रेय मुलींना व त्यांच्या पालकांना जाते.कारण त्यांनी सातत्याने मुलींनी वेळ दिला आहे.त्याशिवाय इतका मोठा सामूहिक नृत्य सोहळा झाला नसता.
यावेळी नृत्यांगण कथक अकादमीच्या संचालिका रेश्मा गोडांबे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.