Daily UpdateLaunchNEWS

 दमदार फीचर्ससह टीव्हीएस ने लॉन्च केली नवीन जुपिटर 110 स्कूटर

Share Post

टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या आणि दुचाकी व तीनचाकी वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक वाहन उत्पादक कंपनीने आज नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० लाँच केली. या स्कूटरमध्ये अत्याधुनिक इंजिन आणि भविष्यवेधीया क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच होत असलेली वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० मध्ये ज्यादा ही संकल्पना स्टामायलेज, कामगिरीआरामदायीपणासोईस्करपणासुरक्षा आणि तंत्रज्ञान अशा सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे. टीव्हीएस ज्युपिटर गेल्या बऱ्याच काळापासून रायडर्सना साथ देत असून, तिचे ६.५ दशलक्ष ग्राहक आहेत. दमदार फीचर्ससह टीव्हीएस ने लॉन्च केली नवीन जुपिटर 110 स्कूटर

लाँचप्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीच्या कम्युटर बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड व मीडिया विभागाचे प्रमुख श्री. अनिरुद्ध हलदार म्हणाले, ’टीव्हीएस ज्युपिटर ११० गेल्या दशकभरापासून टीव्हीएस मोटर स्कूटर उत्पादन श्रेणीचा आधारस्तंभ आहे. आतापर्यंत ६.५ दशलक्ष ग्राहकांनी या उत्पादनावर आपला विश्वास दाखवत तिला भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह ब्रँड्समध्ये स्थान मिळवून दिले आहे. ज्यादा का फायदा हे तत्त्व नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या टीव्हीएस ज्युपिटरमध्ये पुरेपूर वापरण्यात आले आहे. गरजेनुसार टॉर्क देण्याची क्षमता, सुधारित इंधन क्षमतावापरण्यासाठी भरपूर जागाआकर्षक डिझाइन, यामुळे ही स्कूटर वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या गाडीची दर्जेदार वैशिष्ट्ये यापुढेही ग्राहकांना आनंद देतील आणि टीव्हीएस ज्युपिटर ब्रँडचे प्रेम वृद्धिंगत होत राहील.

कामगिरी

टीव्हीएस ज्युपिटर ११० ला ११३.३ सीसीसिंगल सिलिंडर४ स्ट्रोक इंजिन बसविण्यात आले असून, ते ५.९ केडब्ल्यू@६५०० आरपीएम आणि ९.८ Nm@ ५००० आरपीएम (आयजीओ असिस्टसह) आणि ९.२ Nm @ ५००० आरपीएम (असिस्टशिवाय) ऊर्जा निर्मिती करते. स्कूटरमध्ये अग्रेसर तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे आधीच्या उत्पादनांच्या तुलनेत मायलेजमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. हे आयजीओ असिस्ट या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे साध्य झाले आहे. त्यामध्ये इंटेलिजंट इग्निशन सीस्टिम, ऑटो स्टार्ट-स्टॉप फंक्शनॅलिटी आणि आयएसजी (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ओव्हरटेकिंग करताना, तसेच चढावर बॅटरीच्या क्षमतेचा वापर केला जातो व पर्यायाने कामगिरी सुधारते. यामुळे हवे तेव्हा अचूकपणे अतिरिक्त अक्सलरेशन करता येते.

दर्जेदार गुणवत्ता

–    स्टाल आणि उत्सुकता – इन्फिनिटी लॅम्पसह

–    कामगिरी आणि मायलेजचा संगम – नवे ज्युपिटर ११० इंजिन आणि आयजीओ असिस्ट १० टक्के जास्त मायलेज व अधिक चांगले पिकअप देते.

–    व्यवहार्यता आणि आरामदायीपणाचा मेळ – पुढील बाजूस इंधन भरण्याची सोयलांब सीटजास्त लेग स्पेस आणि बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान

–    सुरक्षा आणि नावीन्याचा मेळ – दुहेरी हेल्मेट स्टोअरेजमेटल मॅक्स बॉडीफॉलो मी हेडलॅम्प्सटर्न सिग्नल लॅम्प रेस्टइमरजन्सी ब्रेक वॉर्निंग

–    तंत्रज्ञान व सोस्करपणा – पूर्णपणे डिजिटल ब्लुटूथ अनेबल्ड क्लस्टर कॉल आणि एसएमएसच्या मदतीनेव्हॉइस असिस्टसह नॅव्हिगेशनफाइंड माय व्हिइकल आणि इतर वैशिष्ट्ये

–    निवडीस वाव – सहा आकर्षक रंगांत उपलब्ध

टीव्हीएस ज्युपिटर आरामदायीपणा आणि सोस्करपणा मिळावा, यासाठी खास तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेली विविध वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून, त्यात प्रशस्त ग्लोव्ह बॉक्सफ्रंट फ्युएल फिललांब सीटऑल इन वन लॉक, यूएसबी मोबाइल चार्जर आणि पेटंटेड ई-झेड सेंटर स्टँड यांचा समावेश आहे, स्कूटरचा एलईडी हेडलॅम्प रात्रीचा प्रवास सुरक्षित होईल, याची काळजी घेतो. मोटारसायकलप्रमाणे असलेले याचे फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मोठे 90/90-12 इंची टायर्स प्रवास सहज-सोपा होईल, याची काळजी घेतात. या गाडीत बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान २.० देण्यात आले आहे व ते पुढे, खाली आणि जास्त सेंट्रल मास पोझिशनसाठी वापरण्यात आले आहे. इंधनाची टाकी १००० एमएमने सरकत असल्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅविटी (सीओजी) पुढे आणि खाली होते. यामुळे वाहनाला जास्त चांगले स्थैर्य मिळते. १२ इंची व्हील्स आणि सर्वाधिक व्हीलबेसमुळे नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० ट्रॅफिकमध्ये, कमी वेग असतानाही तिचा सहजपणे समतोल राखता येतो.

डिझाइनचे तत्त्व

टीव्हीएस ज्युपिटर ११० दर्जेदार हँडलबारस प्रशस्त फ्लोरबोर्ड, बदलता येणारी सीटची उंची यांसह बनविण्यात आल्यामुळे कोणतेही जेंडर असलेल्या रायडरसाठी ती आरामदायी ठरते. स्टायलिश पियानो ब्लॅक फिनिश आणि सिग्नेचर इन्फिनिटी लाइट्समुळे गाडीचे रूप आणखी उठावदार व आधुनिक ग्राहकाच्या पसंतीचे झाले आहे. त्यामध्ये पूर्णपणे डिजिटल कलर एलसीडी स्पीडोमीटर, स्मार्ट अलर्ट्स, सरासरी आणि रियल टाइम मायलेज इंडिकेटर्ससह देण्यात आले आहे.

सुरक्षेचे मापदंड

नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० मध्ये सुरक्षा आणि सोईस्करपणाची सर्वोत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली असून, त्यात पुढील बाबींचा समावेश आहे –

–    मेटलमॅक्सची खात्री – मेटल फ्युएल टँकफ्रंट फेंडर आणि साइड पॅनेल्स

–    ड्युएल हेल्मेट स्पेस

–    इमरजन्सी ब्रेक वॉर्निंग

–    टर्न सिग्नल लॅम्प रिसेट

–    फॉलो मी हेडलॅम्प

या स्कूटरसाठी आकर्षक रंग श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे व त्यात डॉन ब्लू मॅटगलाक्टिककॉपर मॅटटायटॅनियम ग्रे मॅट,स्टारलाइट ब्लू ग्लॉसल्युनार व्हाइट ग्लॉस आणि मीटिऑर रेड ग्लॉस यांचा समावेश आहे. याची किंमत ७६,१०० रुपये (एक्स शोरूम महाराष्ट्र) असून, ही स्कूटर ड्रमड्रम अलॉयड्रम एसएक्ससी आणि डिस्क एसएक्ससी या चार व्हेरिएंट्समध्ये टीव्हीएसएम वितरकांकडे उपलब्ध करण्यात आली आहे.

 दमदार फीचर्ससह टीव्हीएस ने लॉन्च केली नवीन जुपिटर 110 स्कूटर
 दमदार फीचर्ससह टीव्हीएस ने लॉन्च केली नवीन जुपिटर 110 स्कूटर