20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे मोहोळ

विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे मोहोळ

विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे मोहोळ
Share Post

भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे श्रमजीवींचे योगदान महत्वाचे मोहोळ गेल्या पंच्याहत्त्तर वर्षात शेतकरी, कामगार या दोन्ही घटकांना काँग्रेस सरकारने फारसे महत्व न देता कामगारांच्या संघटित ताकदीचा उपयोग सत्ता मिळवण्यासाठी केला. अशा परिस्थितीत केंद्रात सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पाच वर्षात जवानांनांसाठी, शेतकरी, कामगार, श्रमजीवींसाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे.विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे मोहोळ

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगार, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी, असे आवाहन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे होते. कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहर सरचिटणीस बापू मानकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ, अनुप मोरे, नामदेव माळवदे, बाळासाहेब टेंमकर, उमेश शहा आदी पदाधिकारी व मान्यवर मेळाव्याला उपस्थित होते.

‘आपला देश तरूणांचा देश आहे. या युवा शक्तीच्या जोरावार विकसित भारताचे स्वप्न मोदीजींनी बघितले आहे, असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘विकसित भारतासाठी देशाने संघटित होणे गरजेचे आहे.

देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींना, कामगारांनी साथ देण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ

शहरध्यक्ष घाटे म्हणाले, ‘ही निवडणूक प्रत्येक देशवासीयांचे आणि आपल्या घरातील भावी पिढीचे भवितव्य ठरवणारी असल्याने प्रत्येक देशवासियांच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत होणारे मतदान हे कोणा उमेदवार किंवा पक्षासाठी होणार नाही, तर देशासाठी केलेले मतदान असणार आहे. मतदानातून स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करावयाची ही क्रांती आहे. त्यामुळे कामगारावर्गानेही मतदारांपर्यत पोचण्याची गरज आहे. ही जबाबदारी कामगारबंधू आनंदाने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींना, कामगारांनी साथ देण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ