मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था-मुरलीधर मोहोळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, 2027 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था-मुरलीधर मोहोळ
पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात मोहोळ बोलत होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, उमेश शहा, प्रवीण चोरबेले, सुप्रसिद्ध व्यापारी फतेचंद रांका, महेंद्र पितलीया, रायकुमारजी नहार, तुलसीदास पटेल, रतन किराड, राजेंद्र भाटिया, दामजीभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, मोदी सरकारच्या दशकात झालेली विदेशी गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढून 640 अब्ज डॉलर्सवर गेली. 2014 पर्यंत देशात केवळ 500 स्टार्टअप्स होते, गेल्या दहा वर्षांत ती संख्या एक लाख 16 हजार इतकी झाली. स्टार्टअप्सच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 26.12 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. जीएसटी करप्रणाली लागू केल्याने एक देश, एक कर धोरणाअंतर्गत व्यापारातील असमतोल दूर होऊन निर्यातीला चालना मिळाली.
मोहोळ पुढे म्हणाले, पुणे व्यापाराचे केंद्र होण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, शहराच्या बाहेर मोठे व्यवसायिक केंद्र उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर विकसित करणे आणि व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.