मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – अजित पवार
लोकसभेच्या चौथ्या टप्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. आज या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहर एवढी वाढली आहेत की त्याच्यामध्ये नव्याने वाढ करणे अशक्य आहे, यामुळेच मला देहू आणि आळंदी यांच्यामध्ये मला तिसरी महानगरपालिका करायची आहे, महापालिकेशीवाय दुसरं पर्याय नाही कारण त्याशिवाय टाउन प्लॅनिंग करणे शक्य होणार नाही, शहर आणि जिल्ह्याच्या सुनियोजित विकासासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयाचा चौकार मारण्याची संधी द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी वाघोलीकरांना केले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – अजित पवार
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,क्षरांचा विकास करताना भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला महानगरपालिका केल्याशिवाय डाऊन प्लॅनिंग चे व्यवस्थितपणे नियम लागत नाहीत, नियोजन चांगलं होत नाही आता आपले बारके बारके रस्ते आहेत उद्या ॲम्बुलन्स घालायची म्हटलं तर जाणार नाही, आग लागली तरी मोठा फायर ब्रिगेडचा बंब जायचं म्हटलं तरी जाणार नाही , पोलिसांचा पिंजरा आत मध्ये घालायचा तरी जाणार नाही. त्यामुळे आपल्याला पुढच्या पंचवीस – पन्नास वर्षाचा विचार करून कोणालाही त्रास होणार नाही असा विकास करायचं आहे.
नवीन महापालिकेसाठी मी तुमच्याशी चर्चा करेल, मी एकदम निर्णय घेणार नाही, मी तो नकाशा दाखवीत कुठला कुठला भाग येतोय कुठले कुठले गाव येतात लोकसंख्या किती आहे.यांचा सविस्तर चर्चा होईल. 2011 ला लोकसंख्येची जनगणना झाली 21ला झाली नाही आता प्रचंड पॉप्युलेशन वाढले त्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. कचरा असेल, वाहतूक असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल , रस्त्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.परंतु आपल्या भागातून त्यांच्या विचाराचा खासदार या वेळेस कुठल्याही तक्रारी न करता शिवाजीराव आढळराव पाटलांच्या रूपाने निवडून द्या, आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील, आपल्याला मदत होईल . महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे की आज सहा वाजता प्रचार संपणार आहे,उद्याचा दिवस फक्त आहे, परवा मतदान आहे मागे जे मतदान झाले तिथे मताची टक्केवारी कमी झाली हा टक्का वाढवणे तुमहाच्या हातात आहे. मतदान हा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर नीट करा तुमच्या प्रत्येकाच्या मतामुळे योग्य खासदार निवडून जाणा आहे, त्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि तशा पद्धतीने वागा असे आवाहन पवार यांनी केले.