25/07/2024

Smart Punekar News

Latest News in Marathi Live Updates

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा
Share Post

पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. यादरम्यान, मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराला अजून पाहिजे तसा जोर आलेला दिसत नाही. पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी यामुळे त्यांच्या प्रचारात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा

मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्या दिवसांपासून प्रचाराचे नियोजन करत समाजातील विविध घटक, समाज, प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना खेळाडू, कलाकार, पहिलवान अशा विविध क्षेत्रातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सी.के. नायडू, डी.बी. देवधर आणि विजय हजारेंसारख्या खेळाडूंना घडवण्यात मोठा वाटा असलेल्या पुण्यातील पीवायसीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत मोहोळ यांनी पुणे शहरात व्हिजन, भविष्यातील शहराच्या गरजा आणि पुढील ५० वर्षांचे नियोजन याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांना देत मोदी सरकारने पुणे शहरासाठी काय-काय केलं? याचीही माहिती दिली.

शिवाय पदाधिकाऱ्यांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी मोहोळ यांच्या पाठीमागे खेळाडूंची ताकद उभी करण्याची ग्वाही देण्यात आली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद, ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशन, मेघराजराजे भोसले, रमेश परदेशी यांच्या पुढाकाराने कलाकार-तंत्रज्ञ यांच्या स्नेह मेळाव्याच्या आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे विनोद सातव आणि मेघराज राजेभोसले यांनीही मार्गदर्शन केले. याला उपस्थिती लावत मोहोळ यांनी उपस्थित कलाकारांनी यापूर्वी मांडलेले प्रश्न व निवेदन याचा लगेचच पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

तर कलाकारांनीही मोहोळ यांना पाठिंबा दिला.महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये तर मूळचे पहिलवान असलेले मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्याचा निर्धार मल्लांनी व्यक्त केला.दरम्यान, रोज विविध समाजाच्या गाठीभेटी घेत मोहोळ प्रचार करत आहेत. त्यामध्ये त्यांना जाट समाज, सिरवी क्षत्रिय समाज, श्री गोडवाड सिरवी क्षत्रिय समाज अशा समाजातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा

मुरलीधर मोहोळांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा