मुरलीधर मोहोळांनी घेतले रांगेत उभा राहून तांबडी जोगेश्वरीचे दर्शन
मराठी नुतन वर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुणेकर तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या विशेष दिनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनीही देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आपल्या साधेपणाने मुरली अण्णांनी लोकांची मने जिंकली.मुरलीधर मोहोळांनी घेतले रांगेत उभा राहून तांबडी जोगेश्वरीचे दर्शन
त्याचे झाले असे की, मुरलीधर मोहोळ हे ग्राम गुढी उभारण्याकरिता तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या इथे गेले होते यानंतर मोहोळ यांनी यांनी तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी गेले.त्यावेळी गुढीपाडवा असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे मुरलीधर मोहोळ दर्शनासाठी रांगेत उभे राहिले.याच साधेपणाने पुणेकरांची मने जिंकली आहेत. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत भाजपा नेते हेमंत रासने आणि कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरीच्या चरणी माथा टेकवला.
यावर्षी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मविआचे रवींद्र धंगेकर व वंचित आघाडीचे वसंत मोरे अशी लढत होणार आहे. हे तिन्ही नेते लोकसभेसाठी जोरदार प्रचार करत आहेत.