“घर चलो अभियान” उपक्रमातून मोहोळांसाठी १२ लाख मतदारांपर्यंत पोहोचणार
पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिककयाने निवडून आणण्यासाठी भाजपनेही पक्ष पातळीवर कंबर कसली असून पक्षाच्या वतीने भाजपच्या वर्धापन दिनी (६ एप्रिल) “घर चलो अभियान” राबवण्यात येणार आहे.“घर चलो अभियान” उपक्रमातून मोहोळांसाठी १२ लाख मतदारांपर्यंत पोहोचणार
६ एप्रिल रोजी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपकडून “घर चलो अभियान” राबवण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात ३ लाख घरांमध्ये एक विशेष पत्रक वाटले जाणार आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार देखील घरोघरी जात पत्रक वाटणार आहे.
दरम्यान, या माध्यमातून भाजपचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. या माध्यामातून प्रत्येक पुणेकरांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. साधारण पुण्यात १० ते १२ लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्यात येणार आहे.
कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर हेही विविध माध्यमातून प्रचार करत आहेत. परंतु, अद्याप पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांच्या प्रचारात पाहिजे त्याप्रमाणात जोर अद्याप दिसून येत नाही. दरम्यान, कॉंग्रेसमधील नाराजीमुळे पक्षाच्या उमेदवाराला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कॉंग्रेसचं केंद्रिय पथक पुण्यात दाखल झालं आहे. दुसरीकडे वसंत मोरे यांची नुकतीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.
“घर चलो अभियान” उपक्रमातून मोहोळांसाठी १२ लाख मतदारांपर्यंत पोहोचणार