Daily UpdatePune | NEWS

आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Share Post

महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला चांगलीच सुरूवात झाली आहे. महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या मतदारसंघात चांगलेच सक्रीय झाले असून मुरलीधर मोहोळ यांना विजय करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

काल मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सिद्धार्थ शिरोळे यांनी गोखलेनगर, निलज्योती हौसिंग सोसायटी लगत असलेल्या कुलदेवता व स्नेहसागर सोसायटीस भेट दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.  यावेळी या सोसायटीस पाणीपुरवठा अपुरा होत असल्यामुळे याठिकाणी आमदार निधीतून मागील काही दिवसांत पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली असून या सोसायट्यांचा पाण्याच्या प्रश्न सुटल्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांचा सत्कारही नागरिकांकडून करण्यात आला.

पुणे लोकसभेत शिवाजीनगर मतदारसंघ हा भाजपसाठी चांगलाच महत्वाचा ठरला आहे. याच मतदारसंघातून मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला लीड मिळाले आहे. त्यामुळे यंदाही भाजपच्या उमेदवाराला लीड मिळावं, यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दीही दिसून येत आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विरूद्ध कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अशी सरळ लढत होती. मात्र वंचितकडून वंसत मोरे यांना उमेदवारी दिल्यानंतर ही लढत आता तिरंगी झाली आहे. मागच्या निवडणुकीत वंचितने देखील आपला उमेदवार दिला होता. त्याचा फटका कॉंग्रेसला बसला होता. तर भाजपचा उमेदवार निवडून आला. याही वेळेस वंचितचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – आमदार सिद्धार्थ शिरोळे