Daily UpdatePune | NEWS

खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ मुरलीधर मोहोळ

Share Post

पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या दक्षिण भागातून बंट्स समाजाबांधव म्हणजे ज्यांना ‘पुणेकर आण्णा’ म्हणून ओळखतो ते पुण्यामुंबईत आले. त्यांनी त्यांचे लक्ष्य फक्त व्यावसायिक म्हणून ठेवले नाही, तर ते पुण्याच्या खाद्य संस्कृतीबरोबरच शहराच्या ऐतिहासिक संस्कृतीशी एकरूप झाल्याने पक्के पुणेकर म्हणून आता त्यांची ओळख झाली आहे. राहिला प्रश्न त्यांच्या समस्या, अडचणीचा तर त्या सोडवण्यासाठीच लोकआम्हाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. लोकप्रतिनीधी म्हणून मी माझ्याकडून शंभर टक्के देत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अशा भावना भाजप-महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ मुरलीधर मोहोळ

बंट्स संघ पुणेने आयोजित केलेल्या समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंट्स समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी बंट्स संघ समाज बांधवांचा मेळावा नुकताच आयोजित केला होता. या मेळाव्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ खास निमंत्रित होते.

यामेळाव्याला बंट्स संघ पुणेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात बंट्स समाजाची साडेतीन ते चारहजार व्यावसायिक कुटुंब असून ती व्यवसायाच्या निमित्ताने किमान पंधरा हजार कुटुंबांशी थेट जोडले गेलेले आहेत.

पुणे शहरात हॉटेल व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याचे बहुतांश काम बंट्स समाजातील व्यावसायिक करत आहेत. चारशेपेक्षा जास्त खासदारांसह देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तिस-यांदा सरकार आणण्यासाठीच आमच्याकडून प्रयत्न म्हणून आम्ही मुरलीधरजी मोहोळ यांना पाठिंबा देत आहोत असे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले.

आमच्या व्यवसायाचा प्रामुख्याने महापालिका आणि राज्य शासनाशी संबंध येतो. राज्याचे मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील आणि महापालिकेत नगरसेवक आंणि नंतर महापौर म्हणून काम करताना मुरलीधर मोहोळ यांनी खूपच चांगला, सक्रिय, सकारात्मक सहयोग आम्हा व्यावसायिकांना दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पुण्यातून उमेदवारी मिळाली असून यापुढेही त्यांचे आम्हाल पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास बंट्स संघाच्या पदाधिका-यांनी व्यक्त करत या निव़डणुकीत मोहोळ यांना बंट्स संघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

पतित पावन संघटनाही मोहोळ यांच्या पाठिशी !

पतितपावन संघटनेनेही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पतित पावन संघटनेने पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी शिवाजीराव चव्हाण, जनाभाऊ पेडणेकर, धनंजय क्षीरसागर, विक्रम मराठे, राजाभाऊ शिंदे, स्वप्निल नाईक, गुरु भाऊ कोळी, संतोष शेंडगे, अशोक परदेशी, प्रवीण झोर, रमेश चलवादी यांच्यासह पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी

अद्याप सुरू झालेली नसली तरी मतदारांच्यात मात्र निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता तयार होत आहे. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वेगवेगळ्या समाज घटकांकडून आपल्या पसंतीच्या उमेदवारांची निवड करून त्यांना समाजाच्चावतीने पाठिंबा जाहीर करायला सुरूवात झाली आहे. तसेच विविध समाज घटकांचे आणि विविधक्षेत्रात कार्यरत असणा-यांचे मेळावे सध्या शहरात सुरू असून मोहोळ यांना त्यात पाठिंबा देण्यात येत आहे.

खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ मुरलीधर मोहोळ
खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ मुरलीधर मोहोळ