ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभेच्या खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री दीपक मानकर पुणे लोकसभेचे उमेदवार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक श्री संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मोहोळांच्या विजयासाठी ब्राम्हण संघटना एकवटल्या !
ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी,श्री प्रमोद जोशी,डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे. या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की गेली 25 वर्ष ज्या भागात काम करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही.बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.
More Stories
The Rise of Pune: Factors Driving the Real Estate Boom
एफिनगूट ने सिग्नेचर क्राफ्ट बिअर कॅनमध्ये केली लॉन्च
विविध सामाजिक उपक्रमांनी समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस साजरा