18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी 

मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी 

मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी 

Share Post

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व शिरूर मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अर्ज भरताना विराट शक्ति प्रदर्शन केले. या खर्चाबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी इंडिया अगेंस्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी केली आहे. मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी

पाटील यांनी या विषयीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे, यामध्ये पाटील यांनी म्हंटले आहे की,  पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवाजीनगर ते डेक्कन व कोचरूड ते डेक्कन 25,500 लोकांची रॅली या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी 150 स्कार्पिओ, इको 250 गाड्या, फोरचुनर इंडीवर अशा अनेक फोर व्हीलर गाड्या घेऊन उपस्थित राहिले होते. यावेळी पक्षाचे झेंडे, उपरणे, टोप्या, चिन्ह आणि बिसलरी वॉटर बॉटल रस्त्यावर पडलेल्या होत्या, जंगली महाराज रोड तब्बल 3 तास बंद होता. त्यामुळे लोकांची प्रथह प्रमाणात गैरसोय झाली.

मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी 

यांच्या अशा राजकारणामुळे लोकांना त्रास का? सभेसाठी जे व्यासपीठ तयार केले होते त्याचा खर्च 15 लाख रुपये बिसलरी पाणी बॉटल 75,000 होत्या जे सभेसाठी उपस्थित कार्यकर्ते होते. त्यांना चहा नाश्ता व जेवण व त्यांच्या गाडी खर्चासाठी डिझेल पेट्रोल साठी प्रत्येकी 500 रुपये दिले होते. त्यामुळे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 1 कोटी 12 लाख व शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 97 लाख रुपये खर्च करून सामान्य जनतेस वेठीस धरले, त्यामुळे त्यांच्यावरती कसून चौकशी करून दूध का दूध पानी का पानी हे जनतेसमोर येणा अत्यंत गरजेचा आहे. व अशा घटना करणाऱ्यांवरती कडक योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्ते सहा में 2024 रोजी आपल्या कार्यालयासमोर जनशक्तीचे आंदोलन करण्यात येईल. तरी आपण त्वरित शहानिशा करून कडक पुढील कारवाई करण्यात यावी असे पाटील यांनी म्हंटले आहे.

मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी 
मोहोळ व आढळराव पाटीलांवर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी